मुख्य कार्याक्रम दिनांक २५/५/२०२२
सकाळी० ९ तेदु.१२.
स्थळ: कर्णवर पाटील मळा, गोरडवाडी ता. माळशिरस जि.सोलापूर.
महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व आप्त, स्वकीय ,गणगोत, सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांना कळविण्यात येते की दिनांक २०|०५|२०२२ ते दिनांक २७|०५|२०२२ या कालावधीत एक आठवडा दोन कर्तुत्वान बंधुची पुण्यतिथी कर्तुत्वान वारसा कडून विविध सामाजिक विधायक कार्यक्रमातून साजरी करण्यात येत आहे.
कै.नानासाहेब व कै.तुकाराम कर्णवर पाटील या कर्तुत्वान बंधुचा जन्म गोरडवाडी माळशिरस येथे धनगर, शेतकरी कुटुंबात झाला.एकाच विचाराने शेती आणि संसार अगदी शून्यातून काबाडकष्ट करुन फुलवला.चाळीस माणसांचे एकत्र कुटुंब तिन पिढ्या एकत्र ठेवून जमाती मध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. नऊ चुलत भावांचे कुटुंबीय या दोन बंधूनी एकत्र ठेवण्याचे काम केले आहे. या दोन बंधूनी फक्त एकत्र कुटुंबाचा संसार तर केलाच पण सक्षम भावी पिढी तयार केली आहे. हे करत असतान त्यांनी गोरड वाडी सारख्या ग्रामपंचायतीचा राजकीय गाडा हाकलण्याचे काम ही केले.कै.नानासाहेब कर्णवर पाटील यांनी उपसरपंच व संरपचकिची जबाबदारी सक्षम पणे पार पाडली. कै.नानासाहेब कर्णवर पाटील हे काही काळ माळशिरस तालुका रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष होते. यांनी कौटुंबिक जबाबदारीबरोबर सामाजिक जबाबदारी ही जोपासली. तिन दिवस साहित्य संमेलन घेणे हे तीस लग्न समारंभ आयोजित करण्या सारखेच आहे .हे साहित्य संमेलनाचे शिव धनुष्य कोणत्याच प्रकार ची कुर कुर न करता श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन यांनी एक हाती पार पाडले. पण कर्तुत्वान,दानशूर, शूरवीर असल्या शिवाय असे दानशूर धाडशी कार्य होवू शकत नाहीत. अशा कार्यक्रमांना आई वडील व कुटुंबाचे आशिर्वाद लागतात हे आशिर्वाद श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांना कै.नानासाहेब कर्णवर पाटील व कै.तुकाराम कर्णवर पाटील यांचे लाभले म्हणूनच समाजा साठी चे हे ऐतिहासिक कार्य करु शकले.कै.नानासाहेब कर्णवर पाटील यांनी या वयातही तरुणाई ला लाजवेल असे कार्य तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन म्हसवड या ठिकाणी केले होते.साहित्य संमेलन उद्घाटनासाठी छत्तीस गजे मंडळास भंडार वाटी दिली होती.एक महिना पुतने अजित कर्णवर पाटील यांच्यासह थंडी वार्यात फिरत होते.संमेलन यशस्वी करून दाखवले.श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन यांचे चुलते निधन पावले होते तरी सर्व चुलत भाऊ दत्त म्हणून बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन यांच्या पाठीशी उभा होते.आजही श्री बाळासाहेब कर्णवर पाटील कै.नानासाहेब कर्णवर पाटील यांची भूमीका बजावत आहेत. तर श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपिआय हे कै तुकाराम कर्णवर पाटील यांची भूमीका कुटुंबात बजावत आहेत. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन व श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपिआय हे कर्णवर पाटील कुटुंबाची दोन कर्तुत्वान व शुरवीर मजबूत चाके आहेत. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन हे समस्त धनगर जमातीचे अशास्थान आहे तर सोमनाथ कर्णवर पाटील एपिआय हे राज्यातील युवकांचे व कर्मचाऱी वर्गाचे अशास्थान आहेत. तसेच हे धमगर साहित्य संमेलन आणि धनगर धर्म पीठ चे आधार स्तंभ आहेत. यांनी आठवडा भर भरगच्च सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक,प्रबोधनात्मक कार्य क्रम राबवत आहेत. दिनांक २०|०५|२०२२ ते २७|५|२०२२ या कालावधीत भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक २७|०५|२०२२ला १२वाजता पुष्पव्रृष्ठीचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम, अखंड अन्नदान कार्यक्रम,गजे ढोल न्रृत्य, आयोजित केले आहेत. कार्यक्रम सांगता २७ तारखेला इंदूरकर महाराज यांच्या किर्तनाने होणार आहे.तसेच साहित्य संमेलन बैठक ही आयोजित करण्यात आली आहे. तरी क्रृपया याविविध कार्यक्रमाचा लाभ गरजू लोकांनी घ्यावा. तसेच दिनांक २७|५|२०२२च्या पुष्पार्पण सोहळ्यास जमातीच्या मान्यवरांनी उपस्थित रहावून कार्यक्रम शोभा वाढवण्याची विनंती कर्णवर पाटील कुटुंबाने केली आहे.
लेखन:
प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले.
संस्थापक धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.