चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले

Share this...

चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनाँक २३ /२४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि सोलापुर येथे होणार आहे. साहित्य संमेलन संस्थापक डॉ अभिमन्यु टकले आहेत , या संमेलनाचे अध्यक्ष श्री आर एस चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत. प्रा. संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत।

पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर येथे झाले। दूसरे साहित्य सम्मेलन २०१८ ला लातूर येथे झाले। तीसरे साहित्य सम्मलेन म्हसवड जि सातारा येथे २०१९ला झाले। चौथे साहित्य सम्मलेन मा आमदार गणपतराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार संगोला येथे जाहीर झाले होते। पूर्ण तैयारी झाली होती। पण कोविड १९ मुळे स्थगित करण्यात आले होते ‘ हे सम्मलेन स्वर्गीय गाणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ होणार आहे , सर्व साहित्य सम्मेलन तीन दिवसाची झाली आहेत. २५ ते ३० हजार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशभरतुन हजेरी लावलेली आहे। या सम्मेलनास किमान ४० हजार विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावण्याची आपेक्षा आहे। या संमेलनात दोन दिवस भरगच्च असे कार्यक्रम आहेत शनिवार दिनांक २३/७/२०२२ रोजी साहित्य दिंडीचा कार्यक्रम सकाळी आठ तें साडे अकरा पर्यन्त असेल। मान्यवर हस्ते दिंडीचे उद्घाटन होईल दिंडी मधे ४० सजवलेले रथ असतील। रथात ऐतिहासिक वेश भूषा धारण केलेले विद्यार्थी शिक्षक कलाकार असतील. यात जमातीचा इतिहास , धर्म,संस्कृति , साहित्य ,रूढ़ि।,परंपरा , चाली ,रीती ,शैक्षणिक प्रबोधन रथ ,सजीव देखावे ,लेज़िम ,भजनी मंडल ,गाजे ढोल, शोभा यात्रा असतील , साहित्य नागरीचे नाव संत बालु मामा नगरी असे असेल तर ग्रन्थ दालनचे नाव संत कनकदास नगरी असे असेल , साहित्य पीठास कवी कालिदास पीठ असे नाव देण्यात येईल ,या सर्व नगरीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल,उद्घाटन सोहळा दुपारी बारा ते तीन वाजे पर्यन्त असेल, उद्घाटन सोहळा मान्यवर यांच्या हस्ते होईल, भंडारा उधळून गजेडोलचया गजरात येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल ,फ़क्त उद्घाटन आणि समारोप सोहळ्यास राजकीय नेत्यांना परवानगी राहील ,उद्घाटन कार्यक्रम मधे संस्थापक सम्मलेन ,अध्यक्ष,सोलापुर जिल्हा पालकमंत्री ,लोकल आमदार ,खासदार ,साहित्यिक ,सामाजिक,शैक्षणिक ,उद्योग ,प्रशासन ,विभागातील मान्यवर असतील, तीन तास जमातीच्या विविध विषयायावर प्रकाश टाकतील ,नविन सहितिकांच्या साहित्याचे प्रकाशन होईल,शिक्षण साहित्य पत्रकारिता वैद्यकीय सामाजिक प्रशासन क्षेत्रातील १० आदर्श मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल, स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्कार देण्यात येईल. तसेच भारत देशयातील एक आदर्श लोकसेवक मुख्यमंत्री यांची निवड करणार आहोत आणि रुख एक लक्ष रुपये शाल श्रीफळ काटी घोंगडी देऊन धनगरजमाती मार्फ़त पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येईल. सम्मलेन अध्यक्ष यांचे भाषण झाल्यानंतर उद्घाटन सोहळा संपेल। गलांडे दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजे पर्यन्त स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम असेल , याचे उद्घाटन संगोला नगरीचे नगरधक्ष्य करतील, या मधे अहिल्या शिक्षण संस्था सांगली अणि विविध शाळा कॉलेजेस सहभाग घेतील , या मधे धनगरी गीते,, ओव्या, धनगरी नृत्य असतील, सायंकाळी ६ते ८ वाजता परिसवांद आहेत। विषय : धनगर साहित्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम वक्ते :मा राम लांडे लेखक ,नवनाथ गोरे लेखक ,प्रा मुकुंद वलेकर। विषय -धनगर सारा एक वक्ते :संजय सोनवानी ईतिहास संशोधक ,लेखक। रात्री ८ते ११ कवी संमेलन होणार आहे , कवी संमेलन अध्यक्ष शिवाजी बंडगर ग्रामीण साहित्यिक हे असतील. सूत्र संचालन भरत दौंडकर कवी हे करतील। ह भ प श्यामसुंदर महाराज कवी ही प्रमुख उपस्थिती असेल. कविसम्मेलनात ४० कवी भाग घेणार आहेत। रविवार दिनांक २४/७/२०२२ रोजी दिवसभर परिसवांद चर्चा सत्र अणि व्याख्याने होतील। विषय ; धनगरांचा राजकीय प्रवास वक्ते :एडवोकेट अण्णा राव patil ,प्रा डॉ किसन माने। विषय : धनगर साहित्याकांची जबाबदारी , वक्ते : चिंतामणी सहस्त्रबुद्धे संपादक दै तरुण भारत। डॉ मधुकर सलगरे लेखक लातुर। विषय : धनगर समाज्याच्या समस्या मिडिया लक्ष्य का वेधून घेत नाही। वक्ते :मा सुभाष बोंद्रे कार्यकारी संपादक दै, दिव्य मराठी , श्यामसुंदर सोन्नर महाराज वरिष्ठ पत्रकार ,विषय :होळकर श्याहीच्या इतिहासातून काय घ्यावें वक्ते : प्रा डॉ यशपाल भिंगे मा सुभाष माने मा संचालक सहकार पणन महामंडळ। विषय :धनगर आरक्षण वक्ते मा सुभाष पाटिल खेमनार मा कृषि संचालक मा गणेश दादा हाके बीजेपी प्रवक्ते विषय : महिलांची सामाजिक जबाबदारी डॉ ज्योति सुल समाजीक कार्यकर्ती ,डॉ स्नेहा सोन सोनकाटे , सौं रुक्मिणी गलांडे डीसीपी पुणे विषय: प्रस्यासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदार्या वक्ते तुषार ठोम्बरे अप्पर जिल्हाधिकारी ,दिलीप पालवे निवृत्त कार्यकारी अभिंयत समारोप सोहळा : सांयकाळी ५ते७या वेळेत घेण्याचे नियोजन केले आहे.प्रस्तावनेचे भाषण संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यु टकले हे करतील. ठराव ही मांडतील व त्याच्या प्रती उपस्थित लोक प्रतिनिधी यांना देतील. स्वागत अध्यक्ष संजय,शिंगाडे सर यांचे भाषण होईल. उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर सत्कार ,स्वागत सोहळा होईल. मनोगत व्यक्त करतील. पुरस्कार वितरण सोहळा होईल व साहित्य संमेलन अध्यक्ष समारोप भाषण होईल. समारोप सोहळा प्रमुख पाहुणे यांचे भाषण झाले की आभार प्रदर्शन होईल. कार्यक्रम सांगता होईल. प्रमुख उपस्थिती मध्ये. श्री संजय सोनवणी लेखक, इतिहास संशोधक, पटकथा लेखक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिका व अध्यक्ष पहिले धनगर साहित्यसंमेलन सोलापूर. अध्यक्ष. मा. मुरहरी केळे साहेब संत साहित्य लेखक, व संचालक विद्युत वितरण महाराष्ट्र शासन व तिसरे साहित्य संमेलन म्हसवड अध्यक्ष. डाॅ.अरूण गावडे,मा.आण्णासाहेब डांगे माजी मंत्री, मा.राम शिंदे माजी मंत्री व उपाध्यक्ष भाजप, मा.आमदार रामराव वडकुते, मा.आमदार हरिदास भदे, आमदार गोपीचंद पडळकर, मा.शरदश्चंद्र पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. श्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री सोलापूर. प्रणिती ताई शिंदे आमदार सोलापूर. स्थानिक सर्व आमदार, खासदार. नगराध्यक्ष, महापौर सोलापूर, जिल्हा परिषद अध्यक्ष. साहित्य संमेलन तयारी जोरदार चालू आहे.हे व्यासपीठ सर्व क्षेत्रातील, जाती धर्मातील सन्माननीय मान्यवर यांच्या साठी सदैव खुले राहील. तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजन समिती मार्फत करत आहोत.

संयोजन समिती.. आपले विनीत:प्रा.डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक धनगर साहित्य संमेलन, धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे आमरावती. श्री धनराज खडसे नागपूर.
श्री खुशाल तांबडे नागपूर. श्री शिवकुमार आवाजे नागपूर.

Share this...

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2022 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design