प्राचार्य श्री रामचंद्र शामराव चोपडे हे नाव राज्यातील सर्व धनगर समाजाला ज्ञात आहे. जे समाजात संपर्क ठेवून आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे की, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली आणि या संस्थेचे विद्यमान चेअरमन प्राचार्य मा रामचंद्र शामराव चोपडे ही नाव काय आहेत.
तर या प्राचार्य मा रा शा चोपडे सर यांची सांगोला येथे २३|२४/जुलै२०२२ रोजी भरणाऱ्या 4 थ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल चोपडे सरांचं मनःपूर्वक
अभिनंदन! तसेच अहिल्या शिक्षण संस्थेच्पा अध्यक्ष पदी२०२२ ते २०२७ पर्यंत फेर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक
माझ्या मते राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली आणि चोपडे सर यांचा समाज विकासात जेवढा वाटा आहे तेवढा इतर कोणाचाच नाही. उपेक्षित धनगर जातीला प्रत्येक्ष कृती आणि थेट लाभ मिळवून देणारी ही एकमेव संस्था आहे. परंतु या संस्थेचे नाव आणि कार्यकर्ते प्रसिद्धी पासून विन्मुख होते. त्यांना शोधून काढत डॉ टकले यांनी चोपडे सरांचा जो सन्मान केला तो अभूतपूर्व आहे
डॉ टकले आपण चोपडे सरांची साहित्य सम्मेलन अध्यक्ष पदी निवड करून, राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था व या संस्थेचे संस्थापक बॅ टी के शेंडगे आणि चोपडे सरांच्या कार्याचा गौरव केला आहे. अशी माणसं अशा संस्था उजेडात आणून त्यांचा यथोचित गौरव केला पाहिजे.
बॅ टी के शेंडगे हे धनगर समाजातील एक रत्न होऊन गेले. पण त्यांच्या कार्याला कोणी जास्त प्रसिद्धी दिली नाही. त्यांनी दुष्काळी आणि धनगर बहुल क्षेत्रात शिक्षण पोहचविले. त्यामुळे त्या भागातील धनगर वस्त्या सुशिक्षित झाल्या.
बॅरिस्टर टी के शेंडगे हे जत विधान सभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येताच जातीय वाद्यानी पुढच्याच पंचवार्षिक पासून तो मतदार संघ राखीव करून टाकला. तिथून ते थेट 2004 पर्यंत जत मतदारसंघ राखीव होता. म्हणजे प्रस्थापित विरोधकांनी बॅ शेंडगे साहेब यांचं राजकीय जीवन उध्वस्त करून टाकल. संपवून टाकलं. अशा परिस्थिती बॅरिस्टर साहेब खचले नाही. वैयक्तिक राजकीय ध्येय संपले असले तरी समाज विकासाचा ध्यास त्यांनी सोडला नव्हता. त्यांनी समाज विकासाच व्रत स्वीकारल. त्यासाठी त्यांनी शिक्षणाचं महत्व ओळखलं. समाज दुष्काळी भागात दऱ्या खोऱ्यात वस्ती करून आहे. इकडे शिक्षणाची गंगा कोण आणणार. त्यासाठी स्वतः बॅरिस्टर साहेबांनी भगीरथ प्रयत्न करून, राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था उभी करून शिक्षणाची गंगा त्या उपेक्षित धनगर वड्या वस्तीवर नेली. त्यांच्या काळात म्हणजे 1960 साला पर्यंत त्यांनी दोन माध्यमिक विद्यालय सुरू केले होते
*इवलेसे रोप लावीयले दारी।*
तिथे चोपडे सरांनी शिक्षक मॅनेजमेंट स्थापन करून आज या संस्थेचा विस्तार केला आहे. आता त्यांचेकडे, 14 माध्यमिक, 5 उच्च माध्यमिक, 5 प्राथमिक, 5 वसतीगृह, एक महाविद्यालय आहेत. एकूण 12 हजार विद्यार्थी इथे शिक्षण घेत असून या संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर एकूण 300 कर्मचारी कार्यरत आहेत.
आता पर्यंत हे सर्व कार्य अंधारात होते. डॉ टकले यांनी मा चोपडे सर यांची 4 थ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी निवड करून हे कार्य प्रकाशात आणले आहे.
श्री चोपडे सर यांची निवड म्हणजे बॅ टी के शेंडगे यांचा गौरव, राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचा गौरव आणि विद्यमान चेरमन श्री चोपडे सर यांच्या कामाचा गौरव. ही निवड म्हणजे त्यांची शिक्षक मॅनेजमेंट आणि शिक्षक शिक्षकेतर वृंदाचा गौरव, माजी विद्यार्थ्यानच्या सहकार्याचा गौरव आहे.
शिक्षण क्षेत्रात हिमालया एवढं उंच कार्य करणाऱ्या श्री रा शा चोपडे सर यांचं साहित्य क्षेत्रातील कार्य सुध्दा खूप अफाट आहे.
राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे विद्यमान चेरमन प्राचार्य श्री चोपडे सर, एम ए मराठी, बी एस सी, बी एड आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य या पदावर 38 वर्ष काम करून ते निवृत्त झाले आणि आता संस्थेत ते चेरमन आहेत. आणखी फेर निवड झाली आहे
अभिनंदन
*साहित्य सेवा*
*सामाजीक, शैक्षणीक, ऐतेहासिक, आध्यात्मिक विषयावर, शाळा महाविद्यालयातून व सभान मधून शेकडो व्याख्याने दिली आहेत.
अशा या महान सरस्वती पुत्राचे २३|२४जुलै च्या सांगोला येथे भरणाऱ्या 4 थ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलन अध्यक्ष पदावर निवड झाल्या बद्दल अभिनंदन
प्राचार्य श्री चोपडे सर आपली निवड फक्त २३|/2४ जुलै२०२२ पुरती नसून ही निवड पुढील पूर्ण एक वर्षासाठी आहे. या एक वर्षाच्या कालावधीत आपण आपला अधिकार वापरून ही धनगर साहित्य चळवळ अधिक उंचावर न्याल याची आम्हाला खात्री आहे. या वर्ष भरात आपण आपल्या सोयीनुसार राज्यभर दौरे काढून समाजात साहित्या विषयी गोडी निर्माण करावी ही विनंती. साहित्य संमेलन आणि अहिल्या शिक्षण संस्था अध्यक्ष पदी निवड आणखी एखदा
पुन्हा एकदा