संपादक दिलीप एडतकर
आमरावती, शुक्रवार दिनांक १|७|२०२२ .
रोजी येथे मा.ज्ञानेश्वर जी ढोमणे ऑडीटर वर्ग एक पदावरून निवृत्त झाले. त्या निमीत्त त्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.अकोला आमरावती, नागपूर, यवतमाळ येथून त्यांचे अनेक मित्र, नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अध्यक्ष स्थानी दैनिक विदर्भ मतदार चे संपादक दिलीपभाऊ एडतकर हे होते.
डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.श्री प्रभाकर दिवनाले महाराज धर्मगुरू विदर्भ धनगर धर्मपीठ,श्री घोडस्कर महाराज आमरावती धनगरधर्मपीठ,उमेश घुरडे संचालक बाजार समिती यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री दिलीप एडतकर अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले शासकीय सेवेतील अनेक अधिकारी सेवेत असतानाच खुर्चीत बसून रिटायर झाल्या सारखे वर्तन करत असतात. पण ज्ञानेश्वर जी ढोमने हे शासकीय सेवेतून रिटायर झाले आहेत.पण ते सामाजिक कार्यातून कधीही रिटायर होणार नाहीत. श्री ज्ञानेश्वर ढोमने यांच्या सारख्या अधिकार्याची शासनाला गरज होती आता त्यांच्या सारख्या माणसांची समाजाला गरज आहे. पुढे बोलताना ते म्हणाले या ठिकाणी आज डाॅ.अभिमन्यु टकले उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून साहित्य संमेलन समाजाचा चांगला उपक्रम सुरू झाला आहे. समाजाचे लोक तो कार्यक्रम घेत आहेत. या वर्षी जा ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त धनगर समाज आहे तो जिल्हा सोलापूर आणि सर्वात जास्त धनगर समाज असलेला तालुका सांगोला. या सांगोला तालुक्यातील लोक साहित्य संमेलन घेत आहेत.दिनांक २३|२४ जुलै २०२२ रोजी सांगोला धनगर नगरी साहित्य पंढरी होनार आहे.या साहित्य पंढरचे विदर्भ अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर ढोमने आहेत. या साहित्य पढंरी मध्ये राज्यातील ना. धो.महानोर सारख्या नामवंत साहित्यीकांनी हजेरी लावलेली आहे. राज्यातील समाजाचे सर्व क्षेत्रातील बौद्धिक लोक विचारांची देवाणघेवाण करत असतात. या साहित्य पंढरी मध्ये या वर्षी पासून खान्देश आणि विदर्भातील सर्व बौद्धिक मंडळीनी साहित्य संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच येथून पुढे साहित्य संमेलनाला सर्वतोपरी मदत केली जाईल व या साहित्य पढंरी सोबत आम्ही सदैव असू असे म्हणाले.
या ठिकाणी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मत व्यक्त करताना सांगीतले की श्री ज्ञानेश्वर ढोमने समाजाशी नाळ जुळलेला कुशल संघटक असून त्यांनी सक्रिय समाकारण आणि राजकारण करावे .
श्री ज्ञानेश्वर ढोमने सत्काराला उत्तर देताना म्हणाले मी जा समाजात जनमाला आलो त्याचे ऋण फेडण्यासाठी मी समाजकारण करत आलो. अनेक अडचणींवर मात करत सेवा निव्रुत्त झालो आहे.माझी शासकीय सर्व बंधनातून मुक्त झालो असून फूल टाईम समाज सेवा करणार आहे याची सुरवात आज पासून आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोलाची तयारी करणार आहे.
डाॅ.अभिमन्यू टकले मनोगत व्यक्त करताना म्हणाले नोकरी तर सर्वच करतात पैसा सर्वच कमवतात पण सर्वात मोठ धन समाज आहे. श्री ज्ञानेश्वर ढोमने सर निव्रुत्त होताहेत त्यांच्या साठी मी आलो नाही तर ज्या ज्ञानेश्वर ढोमणे नी नोकरी करत समाज सेवा केली त्या साठी मी आलो आहे.श्री ज्ञानेश्वर ढोमने सर यांची आयुष्यातील एक रोल पुरा झाला आहे दुसरा सुरू झाला आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेची सेवा करावी. सुखरूप निव्रुत्त बद्दल अभिनंदन तर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.साहित्य संमेलन तळा गाळातील जनते पर्यंत पोहचवा असे अवाहन केले.
अनेक मान्यवरांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हा एक समाजा साठी अभिमानास्पद,सर्व समावेशक स्तुत्य उपक्रम असल्याचे मनोगत व्यक्त केले.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
श्री राजू डांगे यांनी सुत्र संचालन केले.आभार व्यक्त करून तीन तासाचा कार्यक्रम संपला.