मुंबई(प्रतिनिधी):-आदिवासीं धनगर समाजाचे चौथे साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक 23 व 24 जुलै 2022 रोजी सांगोला येथे करण्यात आले असल्याचे अध्यक्ष आर.एस.चोपडे यांनी कुपवाड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणीं पत्रकार परिषदेत जाहीर केले.या दोन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,उदघाटन, परिसंवाद,सांस्कृतिक कार्यक्रम,कवी संमेलन, चर्चासत्र,व्याख्याने,आदि भरगच्च कार्यक्रम होणार असल्याने महाराष्ट्रामधील धनगर समाज बांधवानी या संमेलनाचा लाभ घ्यावा. सोलापूर येथे 2017 साली पहिले आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन,लातूर येथे 2018 दुसरे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन,तर म्हसवड येथे 2019 साली तिसरे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.चौथे आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन आमदार गणपतराव देशमुख यांच्या इच्छानुसार सन 2020 मध्ये जाहिर केले होते,परंतु कोरोना प्रादुर्भाव काळामुळे रद्द करण्यात आले होते. ते आता माजी आमदार गणपतराव देशमुख स्मृतीप्रित्यर्थ चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन सांगोला येथे करण्यात येत आहे.असे अध्यक्ष आर एस चोपडे यांनीं बैठकीत सांगितले. या बैठकीत साहित्य संमेलनाचे संस्थापक अभिमन्यू टकले, कार्याध्यक्ष विष्णु देशमुख,कुंडलिक आलदर,संजय शिंगाडे, माजी महापौर संगीता खोत,नगरसेवक विष्णु माने,उद्योजक पांडुरंग रुपनर व इतर मान्यवर उपस्थित होते.