धनगर धर्मपीठा मार्फत दोन वर्षा पूर्वी सत्संग राबाविली जातं आहे. हीं सत्संग दर सोमवारी रात्री 8 वाजता सुरु होते आणि 10 वाजता संपते. अशा प्रकारे हीं सत्संग अखंड सुरु आहें. त्यात आज पर्यंत कोणताहीं खंड पडला नाही. आता येणाऱ्या 25 डिसेंबर 2022 रोजी रविवारी 100 वी सत्संग आहें.
हीं सत्संग मातोश्री स्व द्रौपदाबाई काळदाते यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ ठेवण्यात आली आहें. या कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थिती रहावे हीं विनंती.
आपल्या समाजात बोटावर मोजण्यात इतपत लोक आहेत जे निस्वार्थ पणे आणि प्रसिद्धी हाव नसलेले लोक आहेत. त्यातील एक नावं डॉ अभिमन्यू टकले एक आहेत.
समाजालां सांस्कृतिक धार्मिक जाण व्हावी त्यातून समाज उन्नत व्हावा म्हणून डॉ टकले साहेबानी आदिवाशी धनगर साहित्य संमेलन घ्यायला सुरवात केली. आता पर्यंत सोलापूर, लातूर, म्हसवड आणि सांगोला असे चार आदिवाशी धनगर साहित्य संमेलन भरवली. त्यातून समाजातील साहित्यिकांनां व्यासपीठ उपलब्ध करून दिल. त्यातून अनेक साहित्यिक उजेडात आले. अनेकांनी प्रेरणा घेऊन लिखाण सुरु केले.
त्यांनी दुसरा उपक्रम हाती घेतला तों म्हणजे धनगर धर्म पीठ. याच्या केंद्रीय अध्यक्षपदी डॉ साहेबांनी माझी नेमणूक केली. प्रदेश अध्यक्ष पदी मा विनायकंराव काळदाते यांची नेमणूक केली. विनायकराव काळदाते साहेबानी या साप्ताहिक सत्संगाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून आज शतक मोहत्सवी सत्संग होतं आहें.
हीं सत्संग सर्वांग सुंदर व्हावी म्हणून महिला भगिनी आणि हं भ पं संतांची खूप मोठी मदत झाली आहें. त्यात सर्वं हभप प्रल्हाद महाराज कळंब महाराज, नंदकिशोर महाराज कोल्हे. महाराज, दिवनाले महाराज, कचरे महाराज यांनी वर्षभर हरि कीर्तनची बाजू समर्थपणे सांभाळाली. श्री वं सौं ढोमणे या दाम्पत्यानें तांत्रिक बाजू सांभाळली. रेशमा ठोंबरे या भगिनीने त्यांना भरपूर सहाय्या केले. प्रा. सरकताई सारख्या विद्वान भगिनींनी वेळो वेळी आपलें विचार मांडले. खूप खूप माता भगिनी संत महापुरुषांचे उदंड सहकार्य लाभले त्यातून हां 100 सोन्याचा दिवस उगवत आहें.
डॉ अभिमन्यू टकले यांनी एकट्यानें सूर केलेलं हे सतीच वाण आज भव्य स्वरूपात साकार होतं आहें. त्यांच्या कामगिरीकडे बघून एक शेर बोलावासा वाटतो.
अकेलेही निकल पडे थें जानीबे मंजिल,
लोग आते गये और कारवा बनता गया!
या परिषदेची कार्यकारणी पुढील प्रमाणे असेल.
— हभप श्री प्रभाकर महाराज दिवनाले कार्यक्रम अध्यक्ष.
-हभप श्री प्रल्हाद महाराज कळंब कार्याध्यक्ष.
-हभप नंदकिशोर महाराज कोल्हे स्वागताध्यक्ष.
– श्री ज्ञानेश्वरजी ढोमणे संयोजक.
–श्रीमती शारदाताई ढोमणे महिला आघाडी संयोजक.
श्री विनायकराव काळदाते महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व यजमान.
🌹खालील मान्यवरांचा
महाराष्ट्र राज्यातील महान संताच्या नावाने प्रमाण पत्र व ट्राफी देऊन धनगर धर्म पीठ मार्फत सन्मान केला जाईल.
-ह.भ.प. मनोहर महाराज डुकरे
-ह.भ.प. सुभाष महाराज काळे.
-ह.भ.प. डॉ.कल्याणीताई पदमने
-ह.भ.प. संगीताताई जोध
-ह.भ.प. अमोल महाराज बांगर
-ह.भ.प. संदीप महाराज गि-हे
-ह.भ.प. अशोक महाराज जायले
-ह भ प श्री दिलीप महाराज भोरे.
-श्री विठ्ठल सजगणे सर.
धनगर धर्मपीठाचे महाराष्ट्र राज्याचे १०० सत्संग घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत त्या सर्वांचा व संत वारकरी परीषदे साठी प्रयत्न केलेल्या सहभागी सर्वांचा प्रमाण पत्र देऊन यथोचित सन्मानित केला जाईल.
श्रीमती रेषमाताई ठोंबरे
श्री रामराव महाराज घोडसकर
ह.भ.प. संतोष महाराज घोंगे
प्रमुख अतिथी:
श्री. संभाजीराव सुळ. उपाध्यक्ष धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.नेते काँग्रेस नेते लातूर.
मा.आमदार हरिदास भदे.
मा.आमदार रामराव वडकुते.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडी.
श्री संजयजी शिंगाडे स्वागताध्यक्ष ४थे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
डाॅ आकुंश नवले. अध्यक्ष भारत जनसंग्राम पक्ष.आमरावती.
श्री बबनराव बरकडे धनगर धर्म पीठ अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र.
श्री पाडुंरगजी रूपनवर सांगली.समाज सेवक,उद्योजक, धनगर साहित्य संमेलन आधार स्तंभ
श्री व्यंकटेश चामनर आंबेजोगाई.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.मुंबई विभागीय अध्यक्ष.
श्री छगन सेठ पाटील उद्योजक ठाणे.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
🌹कार्यक्रम पत्रिका
सकाळी ९ते११.
उदघाटन- स्व.द्रौपदाबाई काळदाते व संताच्या प्रतीमा पुजन.
श्री हरिदासजी भदे व श्री बबनराव बरकडे व सर्व प्रमुख अतिथी.
दिवंगताना आदरांजली.
स्वागत गीत, स्वागत संमारभ. संत पुरस्कार प्रदान कार्यक्रम.
जगदगुरू तुकोबाराय यांचे नाव व्यासपीठास दिले जाईल. संत बाळूमामा हे नगरीला नाव दिले जाईल.
संत ज्ञानेश्वर माऊली
संत मुक्ताबाई ,
श्री संत कनक दास, संत जनाबाई,संत नामदेव महाराज, शांती ब्रम्ह संत एकनाथ महाराज ,संत गोरोबा काका ,संत कान्होपात्रा,संत सेना महाराज,संत चोखामेळा,संत बहिणाबाई,
भक्त पुंडलीक, संत गाडगे महाराज,संत तुकडोजी महाराज ,संत सेवालाल महाराज, संत भगवान महाराज.
यांच्या सन्मानार्थ हभप मान्यवरांना प्रमाण पत्र पुरस्कार दिले जातील.या व्दारे संताच्या कार्याचे स्मरण केले जाईल.
प्रमुखांचे थोडक्यात मनोगत .
-सकाळी ११ते दुपारी ४ विविध विषयांवर संत आणि वारकरी यांचे नेमून दिलेल्या विषयावर
प्रवचन / प्रबोधन.
प्रबोधन व प्रवचन या मध्ये अध्यात्म,धर्म संत परिवार काल, आज आणि उद्या. हे विषय असतील . विषय ठराव पुढच्याच आठवड्या जाहीर करू.
दुपारी ४ते४:३० ठराव वाचन आणि समारोप.
मी अमेरिकेत असल्यामुळे या कार्यक्रमालां उपस्थिती राहू शकत नाही. क्षमस्व!
कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा!
🕉️🚩🙏🏻🚩🕉️ बापू हटकर