सोलापूर: पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य
शनिवार व रविवार दिनांक २४|२|२४ व २५|२|२४ रोजी श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर विजापूर हायवे बेलाटी ता.उत्तर सोलापूर जि सोलापूर येथे होणार आहे.या दोन दिवसात श्रोत्यांना बौद्धीक मेजवानी व विचाराची आदानप्रदान होणार आहे. अशी माहिती डाॅ.अभिमन्यु टकले यांनी पत्रकार परिषदेत मांडली.पाचव्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक वक्ते माजी आमदार ऐडव्होकेट रामहरी रूपनवर माळशिरस यांची निवड झाली आहे.तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पदी श्री संत बाळूमामा ट्रस्ट विजापूर बायपास हायवे बेलाटी चे अध्यक्ष श्रीराम हणमंतराव पाटील यांची निवड झाली आहे.
शनिवार दिनांक २४|०२|२०२४ रोजी सकाळी ८ते११:३०या दरम्यान साहित्य दिंडी निघणार आहे. दिंडीच्या पालखीचे पुजन माजी आमदार दिलीपराव माने हे करतील. दिंडी श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर स्वागताध्यक्ष यांच्या बेलाटीतील वाड्यासमोर पुजन करून निघेल. श्री सदगुरू बाळू मामा मंदिर येथे बाळू मामाच्या नावान चांग भल म्हणून टेकवली जाईल.
दिंडीत गजे ढोल, लेझीम अशी पथके आहेत.
दुपारी १२ते ३या वेळेत श्री संत सदगुरू बाळूमामा मंदिर विजापूर हायवे बेलाटी येथे साहित्य संमेलना चा उद्घाटन सोहळा आहे.साहित्य स्थळाला संत बाळूमामा साहित्य नगरी असे नाव दिले आहे. विचार पिठाला श्री सिध्देश्वर विचार पीठ असे नाव देण्यात आले आहे.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या नावाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.उद्घाटन साठी मा.सुशीलकुमार शिंदे साहेब माजी ग्रंहमंत्री यांना निमंत्रण दिले आहे.
मा.चंद्रकांत दादा पाटील पालक मंत्री सोलापूर, आमदार श्री राम शिंदे माजी मंत्री, श्री विजय देशमुख आमदार उत्तर सोलापूर, श्री सुभाष देशमुख आमदार दक्षिण सोलापूर, प्रा. श्री अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख, पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संमेलनास राज्यासह देश भरातून अनेक साहित्यीक उपस्थित राहणार आहेत. डाॅ.श्रीपाल सबनीस अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मा.संजय सोनवनी अध्यक्ष पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य सोलापूर, श्री राजा माने अध्यक्ष सोशेल मिडीया अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, घनश्याम होळकर भरतपुर राजस्थान लेखक, श्री पंडीत चंद्रकांत बिज्जरगी गुरूजी प्रसिद्ध साहित्यिक विजापूर, डाॅ.मुरहरी केळे संत साहित्य अभ्यासक मुंबई, डाॅ.श्रीमंत कोकाटे,साहित्यीक व वक्ते पुणे,डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, श्री सुभाष बोंद्रे दिव्य मराठी स्टेट हेड व साहित्यीक, प्रा.यशपाल भिंगे साहित्यीक नांदेड, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभा पुर्वी निधन झालेल्या साहित्यीकांना आदरांजली वाहिली जाणार आहे.स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.भंडारा उधळून यळकोट यळकोट जय मल्हार च्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले जाणार आहे.नंतर पुस्तक प्रकाशन केले जातील. सर्व मान्यवरांचे स्वागत केले जाणार आहेत. राज्यभरातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सेवकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.त्यानंतर मान्यवरांकडून श्रोत्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.अध्यक्षीय भाषणाने उद्घाटन समारंभ समारोप होईल. ३ते ४:३० या वेळेत एक परिसंवाद आयोजित केला आहे .सांयकाळी ४:३०ते६:३० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी ६:३० ते रात्री ८:३० वाजता कवी संमेलनाचे उद्घाटन श्री राम माडुंरके कवी निव्रुत्त सहायक पोलीस आयुक्त पुणे हे करतील. संयोजन भारतकुमार मोरे करतील. श्री रविराज मेटकरी हे कवी संमेलनाध्यक्ष असतील. महाराष्ट्र राज्यातून ४० कवी सहभागी होणार आहेत.
दुसर्या दिवसी रविवार दिनांक २५|०४|२०२४ रोजी सकाळी ०९वाजता परिसंवादाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दिवसभरात चार विविध विषयांवर चार परिसंवाद होणार आहेत. सांयकाळी ४ते ६ या वेळेत समरोप कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे उद्घाटक डाॅ.श्रीमंत कोकाटे इतिहास संशोधक पुणे हे आहेत. डाॅ.बाबासाहेब बंडगर माजी कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे समारोपाचे अध्यक्ष आहेत. प्राचार्य आर एस चोपडे सर, विष्णु माने नगरसेवक सांगली,श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली, मा.आमदार हरिदास जी भदे आकोला,प्रा.सुषमा अंधारे, श्री आण्णासाहेब डांगे साहित्यीक व माजी मंत्री, उपस्थित राहणार आहेत.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे आमरावती, श्री पवन थोटे यवतमाळ., तसेच श्री अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. ऐडव्होकेट चिमन डांगे इस्लामपूर हे उपस्थित राहणार आहेत. सौ रुक्मीणी ताई गंलाडे,एसीपी पुणे,श्री बाळासाहेब कोपनर डीवायएसपी पिंपरी चिंचवड हेही उपस्थित राहणार आहेत. श्री रामदास कोकरे सहआयुक्त नगर रचना जिल्हाधिकारी कार्यालय लातूर.
समारोपात राज्यातील अधिकारी व मान्यवर उपस्थित सर्व साहित्यीकांचा सत्कार करण्यात येणार आहेत. समारोप मान्यवरांची मार्गदर्शन पर भाषणे होतील. ग्रंथ दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या. कलाकारांना प्रशस्ती पत्रक दिले जाणार आहेत. विविध विषयांवर ठराव पास केले जाणार आहेत. संमेलनाध्यक्ष समारोपाचे भाषण करतील. श्री सिध्दारूड बेडगनूर सर संयोजक आभार प्रदर्शन करतील व राष्ट्र गिताने कार्यक्रमाची सांगता होईल.
पत्रकार परिषदेत ऐडव्होकेट रामहरी रूपनवर यांचा साहित्य संमेलन अध्यक्ष निवड झाली म्हणून सत्कार करण्यात आला. पत्रकार परिषदेस खालील मान्यवर उपस्थित होते. ऐडव्होकेट रामहरी रूपनवर नियोजित साहित्य संमेलन अध्यक्ष. श्रीराम हणमंतराव पाटील बेलाटीकर स्वागताध्यक्ष, श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष, डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक, श्री सिध्दारूड बेडगनूर सर संयोजक, श्री देवेंद्र मदने सर मार्गदर्शक,श्री रामचंद्र खांडेकर दाजी मोहळ,श्री विलास पाटील धनगर समाज अध्यक्ष, श्री बिसलसिद्ध काळे प्रसिद्धी प्रमुख, श्री चंद्रकांत हजारे इ.मान्यवर उपस्थित होते.