आमदार गोपीचंद पडळकर सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक ला उद्घाटनास येणार.

Share this...

प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले.

पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे प्रस्थापित आणि घराणे शाहीचे राज्य. सत्तेच्या मस्तीत माजलेली घराणी आणि माजलेले प्रस्थापित. या माजलेल्या लोकांचे एकच तंत्र दिन दलित ओबीसी यांच्यात पश्चिम महाराष्ट्रात कोणीही नेता होवू द्यायचा नाही. सत्तेचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करुन , वेंळ आलीच तर एमपीडी करून नेते संपवले जात होते. किंवा आपल्यातलेच एखादा भुकंनारा श्वान सोडून नेते संपवने. अशा भयंकर व भयावह परिस्थितीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाचा जन्म झाला. मा.बापूसाहेब हटकर बदलापूर ठाणे यांची खूप मोठी ईच्छा की राज्यातील सर्व कार्य करणार्या लोकांनी एकत्र काम केले पाहीजे लढणार्याच्या बरोबर खंबीर पणे उभा राहीले पाहिजे. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील, श्री हणमंतराव चौरे तात्या ,संभाजीराव सुळ आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक राजकीय आणि समाज सेवकांची प्रबळ ईच्छा होती की मा.आमदार गोपीचंद पडळकर यांनी या साहित्य संमेलन चळवळीच्या उद्घाटनास यावे. आमदार गोपीचंद पडळकर हे जन्मानी कर्मानी लोक नेते आहेत. महाराष्ट्र राज्यातील घराणेशाहीतील नेते हे बनवलेले आणि लोकांवर जबरदस्ती लादलेले असंवेदनशील चिखलाच्या पुतळया सारखे नेते आहेत. Gopichand Padalkar is born leader and not made leader like established leaders.

मी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सकाळी तक्रार निवारण लोकशाही दरबारात गेलो अनेक कार्य कर्ते आले होते. सगळ्यांचे आदरा तिथ्य करणारी टिम होती आमचे ही आदरातिथ्य केले.आम्ही बाळासाहेब कर्णवर पाटील ,उज्ज्वलकुमार माने मी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले . स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी माझा फेटा बांधून व शाल पांघरुण सत्कार केला. साहित्य संमेलन उद्घाटनास येण्याचे निमंत्रण स्वीकारले. त्यांचा लोकशाही दरबार पाहून असे वाटते की भाजप सरकारने धनगर समाजाला भाजप तर्फे कैबिनेट मंत्री पद दिलेले नाही. जर आमदार गोपीचंद पडळकर सारख्या आमदाराना कैबिनेट दर्जा मिळाला तर धनगर समाजाचेच नाहीतर सर्व जाती जमातीचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल व सरकारचे लोक पाठबळ मजबूत होवू शकते.
आमदार गोपीचंद पडळकर यांचे मी आभार मानले. भेटी मुळे आनंद झाला.आमदार गोपीचंद पडळकर यांना खूप मोठा राजकीय पल्ला गाठण्या साठी शुभेच्छा.



प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र.

Share this...

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design