आदिवासी धनगर साहित्य संमेलनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Share this...

सोलापूर: सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन 11 व 12 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील ऐतिहासिक होळकर राजवाड्यात होत असून, या संमेलनाच्या अनुषंगाने समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, ही माहिती संमेलनाचे संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली.

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे आहेत. श्री. संजीवन खांडेकर, भूम, जिल्हा धाराशिव यांना उत्कृष्ट सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शैक्षणिक रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्राचार्य श्री. सिद्धारूढ बेडगणूर, सोलापूर यांचे शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आणि सामाजिक सेवा उत्कृष्ट आहे. कोणत्याही कामासाठी ते सदैव तत्पर असतात. ते एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असून प्राचार्य आहेत. यांना श्री संत बाळूमामा समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सौ. रूपाली लंभाते-अवचरे, कवयित्री पुणे. या कवियत्री असून दिवाळी अंक व अनेक नवोदित आणि प्रख्यात लेखक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे काम करतात. त्यांचीही अखंड साहित्यिक सेवा, सामाजिक सेवा विचारात घेऊन त्यांना कवी कालिदास साहित्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

श्री. प्रवीण काकडे, कराड, जिल्हा सातारा. यांचे समाजासाठी व समाज प्रबोधनासाठी खूप मोठे कार्य आहे. दरवर्षी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून समाजातील युवकांना व युवतींना मार्गदर्शन करत असतात. यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

श्री. गणेश पुजारी, पुणे. या व्यक्तीने आयुष्यभर धनगर समाजाच्या सेवेसाठी वाहून घेतलेले आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांनी आजपर्यंत त्यांची सर्व हयात समाजाच्या सेवेसाठी घालवलेली आहे. अशा या महान कार्यासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ॲड. बळवंतराव खोत, सांगली. यांचे सामाजिक कार्य अगदी उत्कृष्ट आहे. सांगलीमध्ये बाहेरून येणारे कोणीही समाजसेवक कार्यक्रम घेत असतील किंवा राज्यभर कोणत्याही प्रकारची चळवळ चालू असेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता धावून जाणारे ॲड. बळवंतराव खोत यांना सुभेदार मल्हारराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

श्री. पवन थोटे, यवतमाळ, समाजसेवेमध्ये जीवनभर कार्यरत असलेले श्री. पवन थोटे यांनी यवतमाळ जिल्ह्याची समाजसेवा जिवंत ठेवलेली आहे. तसेच राज्यभर ज्या विविध चळवळी होतात त्या चळवळीमध्ये यवतमाळकरांना सक्रिय सहभाग घ्यायला लावणारे पवन थोटे यांना राजा हल सातवाहन समाजसेवा पुरस्कारने सन्मानित करण्यात येत आहे.

डॉ. महादेव बनसुडे, लातूर, वैद्यकीय सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे प्रा. डॉ. महादेव बनसुडे यांना क्रांतिरत्न विठोजी होळकर वैद्यकीय सेवा पुरस्कार देण्यात येत आहे.

श्री. गोविंद गोरे, नांदेड. हे रुग्णालयामध्ये कर्मचारी असलेली व्यक्ती. यांना समाजाबद्दल खूप गर्व आणि अभिमान आहे. तसेच रुग्णालयीन सेवा असो, समाजसेवा असो किंवा राज्यस्तरीय कुठल्याही प्रकारच्या चळवळी असो, राज्यस्तरीय कोणत्या प्रकारचे कार्यक्रम असो ते त्यामध्ये सक्रिय भाग घेतात व सर्व प्रकारचे सहकार्य करतात. अशा या व्यक्तीला संत कनकदास समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करणार आहे. डॉ. आहिल्या वाघमोडे, कराड. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शैक्षणिक आणि संशोधनसाठीचा पुरस्कार आहे. प्रा. डॉ. महेश चौरे, आंबेजोगाई यांना अहिल्या रत्न साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

प्राचार्य धोंडीराम गडदे यांना महाराजा श्रीमंत शिवाजीराव होळकर शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.

अशा तऱ्हेने राष्ट्र सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या संयोजक टीमने पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध मान्यवरांची निवड केलेली आहे निवड समिती उज्वल कुमार माने पत्रकार. माननीय बाळासाहेब धरणावर पाटील महाराष्ट्र अध्यक्ष.
बापूसाहेब शिंदे संयोजक श्री शिवाजीराव ढेपले स्वागताध्यक्ष. श्री सोमनाथ जी करणावर पाटील एपीआय व संचालक. एडवोकेट सौ जयश्री ताई तेरकर महिला आघाडी अध्यक्ष.
प्राचार्य आर एस चोपडे सर.

Share this...

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design