धनगर समाजात जन्मलेले संत तुकाराम डॉ अभिमन्यू टकले होय!

Share this...

डॉ अभिमन्यू टकले. ध्येयाने झपाटलेला माणूस. अत्यंत शांत वृत्ती. धनगरांना शहाणं करून सोडायचं या ध्येयाने पछाडलेला माणूस आहे. मुळात साहित्य संमेलन भरवण अत्यंत अवघड काम आहे. त्यांत धनगराचं साहित्य संमेलन भरवण म्हणजे कच्च्या घड्यानें पाणी भरण्या सारखे काम आहे. ते पाणी भरणं डॉ टकले यांनी केलं.

भगवान शंकराला जे जमलं नाही ते डॉ अभिमन्यू टकले नावाच्या माणसाने करू दाखविले.

धनगराचा उद्धार करावा म्हणुन शंकराने खंडोबाचा अवतार घेतला होता. धनगर शहाणा होणं तर सोडाच उलट शहाणा असलेलेला महादेव म्हणजे खंडोबा धनगरांच्या नादी लागून वेडा झाला. लोक त्याला येडा मल्हारी म्हणु लागले. त्यांना सुधारायचे म्हणुन डॉ टकले घरा बाहेर पडले. त्यांच्या कामाच सूत्र होतं ते म्हणजे धनगरातील साहित्यिक शोधायचे त्यांना प्रसिद्ध करायचे आणि ईतर धनगरांना साहित्यिक बनवायचे.

साहित्य हे सुशिक्षित आणि सुसंकृत माणसाचं प्रतीक आहे. त्यांच्यातील साहित्यिक जागा केला म्हणजे तो माणूस सर्वं अंगाने श्रीमंत होतों. म्हणुन मग त्यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलन भरवायला सुरवात केली!
डॉ टकले यांनी धनगर साहित्य संमेलनाची कल्पना मांडली तेंव्हा सर्वं लोक त्यांना हसायचे. डॉ असं काही संमेलन भरवतील, त्यांना लोक भरवू देतील यावर कोणाचाच विश्वास नव्हता. माझा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. कारण चौडीत अहिल्यादेवीचा पुतळा बसवायला गेलो तो अनुभव घेऊन नुकतेच माझे हात भाजले होते. मी संपशेल माघार घेऊन घरात गप्प बसलो होतो.

तसंचं काही तरी डॉ टकलेंच होईल आणि त्यांना घरात बसाव लागेल असं मला वाटलं होतं. परंतु ठरलेल्या कामातून माघार घेणं हे डॉ टकलेना माहीत नव्हते. म्हणजे ते आरेला कारे करून समोरच्याला गप्प करतील असं काही त्यांच्या स्वभात नाही. ते शांत सय्यमी आहेत. त्यांच्यात परकोटीची सहन शिलता आहे. या सहन शिलतेने त्यांना विजय मिळवून दिला. पहिल्या संमेलनाला त्यांना खूप त्रास झाला. काही राजकीय नेते दांडगाई दाखवत होते. हे सर्वं त्यांनी संत तुकाराम सारखे सहन केले.
ज्यांचा सहित्याशी संबंध नाही ते राजकारणी म्हणत होते कीं आम्हाला अध्यक्ष करा. डॉ त्यांना समजून सांगितले हे साहित्यिकांचे संमेलन आहे. तुम्ही एखादे पुस्तकं लिहा मग तुम्हाला अध्यक्ष करू. पण पुढारी म्हणत होते, इथे पुस्तकाचा काही संबंध नाही. कार्यक्रम धनगर सजाजाचा आहे, धनगरांचा अध्यक्ष माझ्या शिवाय दुसरा कोणी नाही होऊ शकत.

पण डॉ साहेबांनी साहित्यिक आणि इतिहासकार संजय सोनवणी यांच्या अध्यक्षते खाली संमेलम घेतले व पार पाडले. यावेळी संभाजी सूळ त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले. पुढे अनेक सज्जननी त्यांना पाठबळ दिले. ज्यात, बाळासाहेब करणवर, बेलाटीचे पाटील यांचा अर्थपूर्ण सहभाग आहे. तसेच बऱ्याच वेळी डॉ टकले यांनी पदर मोड करून 5 संमेलन पार पाडली. आता 6 व आदिवासी धनगर साहित्य संमेलनं 11 आणि 12 एप्रिल 2026 ला चांदवड या होळकरांच्या नगरीत होतं आहे.
याचे अध्यक्ष पद प्रा डॉ प्रकाश महानोर, सोलापूर विद्यापिठाचे कुलगुरु भूषविणार आहेत तर याचं उदघाटन तरुण तडफदार आमदार आणि फायर ब्रँड नेते गोपीचंद पडळकार यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी नाशिकच्या काळारामं मंदिराचे पुजारी महामंडलेश्वर महंत सुधीरदासजी महाराज उपस्थित राहणार आहेत.

हे वर्षे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्री संवत्सर जयंती वर्षे असल्यामुळे होळकर यांच्या महाराष्ट्रातील राजधानी चांदवड या शहरांत ठेवण्यात आले आहे. 11/12 एप्रिल असे दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला समाजातील अनेकं साहित्यिक आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थित समाजातील कर्तव्य तत्पर व्यक्तींचा सत्कार करण्यात येईल. तरी राज्यातील समाज बांधवानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीं विनंती!

– बापू हटकर

Share this...

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design