नागपूर :रविवार: दिनांक :१९|६|२०२२.
आज ठिक सकाळी १०वाजता. सकाळी ११:१७ वाजता दोन वेळा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य शिष्ट मंडळाची मा.नितीन जी गडकरी यांनी भेट घेतली.परंतु सकाळी११:१७ वाजता शिष्ट मंडाळास भेट देवून सविस्तर चर्चा केली. श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली यांनी घोंगडे घालून सत्कार केला. डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक अध्यक्ष धनगर साहित्य संमेलन व संस्थापक धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य यांनी निमंत्रण पत्र दिले.श्री संजय शिंगाडे सर -स्वागताध्यक्ष यांनी व श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मा. आमदार नागो गानार सर शिक्षक मतदार संघ नागपूर, मा.ऐडव्होकेट ढेरे सर सांगोला. मा.सोमनाथ मोटे सचिव रासप सांगोला.मा.तुकाराम मासाळ कवठेमहंकाळ. श्री अर्जुन हजारे पत्रकार नवमहाराष्ट्र सांगली. श्री आवजे शिवकुमार, श्री धनराज खडसे सर कवी.श्री खुशाल तांबडे समाज सेवक नागपूर. श्री श्रीधर भांगे सर लातूर.
हे सर्व शिष्ट मंडळ सदस्य उपस्थित होते. डाॅ.अभिमन्यु टकले यांनी त्यांना निमंत्रण दिले. दिनांक २३|७|२०२२ रोजी आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य सांगोला उद्घाटनास यावे हीच लोकांची लोकभावना आहे असे सांगीतले. म्हणूनच तुम्ही माझ्याकडे निमंत्रण देण्यास आले आहेत असे मंत्री महोदय म्हणाले.तसेच मी नक्की येणार आहे आणखी काही कार्यक्रम लावता येतो का तेही पाहू असे मा.केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब म्हणाले. डाॅ.अभिमन्यु टकले यांनी व श्री रामराव वडकुते माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली यांनी सर्व शिष्टमंडळातील सदस्यांची ओळख करून दिली. अशा तर्हेने आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांची भेट यशस्वी झाली.