चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार व रविवार दिनांक २३ व २४ जुलै २०२२ रोजी सांगोला जि.सोलापुर येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाला देशभरातून जास्तीत जास्त समाज बांधव, भगिनींनी उपस्थित राहण्याचे आव्हान धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे पवन थोटे यांनी केले, या साहित्य संमेलन संस्थापक डॉ. अभिमन्यु टकले आहेत,या संमेलनाचे अध्यक्ष श्री.आर.एस.चोपड़े अहिल्या शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष आहेत.प्रा.संजय सिंगाड़े सर हे स्वागत अध्यक्ष आहेत.
पाहिले साहित्य संमेलन २०१७ ला सोलापुर येथे झाले। दूसरे साहित्य सम्मेलन २०१८ ला लातूर येथे झाले। तीसरे साहित्य सम्मलेन म्हसवड जि सातारा येथे २०१९ला झाले। चौथे साहित्य सम्मलेन मा आमदार गणपतराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार संगोला येथे जाहीर झाले होते। पूर्ण तैयारी झाली होती। पण कोविड १९ मुळे स्थगित करण्यात आले होते ‘ हे सम्मलेन स्वर्गीय गाणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ होणार आहे,सर्व साहित्य सम्मेलन तीन दिवसाची झाली आहेत. २५ ते ३० हजार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशभरतुन हजेरी लावलेली आहे, या सम्मेलनास किमान ४० हजार विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावण्याची आपेक्षा आहे, या संमेलनात दोन दिवस भरगच्च असे कार्यक्रम आहेत,उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते,खा.डॉ.विकासजी महात्मे, आ. राम शिंदे, श्रीमती रतन गणपतराव आ.प्रशांत परिचारक.गोपीचंद पडळकर,आ.सुभाष देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, श्री. गणेश हाके, मा.आ.रामराव वडकुते,मा.आ. विजय देशमुख,श्री.चंद्रकांतदादा देशमुख,डॉ.बाबासाहेब देशमुख,राणी माने,आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल,भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल, यामध्ये नविन साहितिकांच्या साहित्याचे प्रकाशन होईल,शिक्षण साहित्य पत्रकारिता वैद्यकीय सामाजिक प्रशासन क्षेत्रातील १० आदर्श मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल,स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख आदर्श आमदार पुरस्कार देण्यात येईल. तसेच भारत देश्यातील एक आदर्श लोकसेवक मुख्यमंत्री यांची निवड करणार आहोत आणि एक लक्ष रुपये शाल,श्रीफळ,काठि, घोंगडी देऊन धनगर जमाती मार्फ़त पुरस्कार देऊन भव्य सत्कार करण्यात येईल. सम्मलेन अध्यक्ष यांचे भाषण झाल्यानंतर उद्घाटन सोहळा संपेल.रविवार दिनांक २४/७/२०२२ रोजी दिवसभर परिसवांद चर्चा सत्र अणि व्याख्याने होतील, त्यानंतर समारोप सोहळा नवी दिल्लीचे मुख्यमंत्री श्री.अरविंदजी केजरीवाल,आ.दिनेश मोहनिया नवी दिल्ली,संमेलनाध्यक्ष श्री.आर.एस. चोपडे,आ.दत्तामामा भरणे,आ. शहाजीबापू पाटील,मा.मंत्री, अण्णासाहेब डांगे,मा.आ.रामहरी रुपनवर,मा.आ.महादेवजी जानकर,मा.आ.प्रकाशअण्णा शेंडगे, मा.आ.हरिदास भदे,मा.आ. नारायणआबा पाटील,मा.आ.रमेश शेंडगे,श्री.विष्णू माने,संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिमन्यू टकले,प्रा. संजय शिंगाडे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम होणार आहे,यवतमाळ जिल्ह्यातील व राज्यातील सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन समाजाचे नेते श्री.पांडुरंगजी खांदवे,श्री.वसंतराव ढोके,श्री.श्रीधर मोहोड,श्री.राजेश गायनर,धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे श्री.पवन थोटे,व संयोजन समिती मार्फत करण्यात येत.