सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे होळकर वाडा ता. चांदवड जि.नाशिक येथे होणार आहे. या संदर्भात डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांची भेट घेण्यात आली .साहित्य संमेलन अध्यक्ष पद व सहभागी साहित्यिक या विषयावर त्यांनी चर्चा केली. साहित्य संमेलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे सांगीतले. तसेच डाॅ श्रीपाल सबनीस अध्यक्ष ८९वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचीही भेट घेतली.
ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमा निमीत्त सोलापूर ला आले होते. भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा केली त्यांनीही चांदवड जि.नाशिक येथे साहित्य संमेलनाला सक्रिय रित्या येणार असल्याचे सांगीतले. डाॅ.श्रीपाल सबनीस सरांना थोडक्यात साहित्य संमेलनाची रुपरेषा सांगीतली. आपले चांदवड चे सहावे संमेलन दोन दिवसाचे असेल. सकाळी दोन तास साहित्य दिंडी होईल.नंतर तीन ते चार तास साहित्य संमेलन उद्घाटन सोहळा होईल. उद्घाटन सोहळ्यात पुस्तक प्रकाशन, राज्यातील पाच लोकांचा पुरस्कार व कौतुक सोहळा होईल व मान्यवरांची मार्गदर्शन व व्याख्याने होतील.

नंतर विविध विषयांवर दोन परिसंवाद होतील. सांयकाळी कविसंमेलन होईल. दुसर्या दिवसी परिसंवाद उद्घाटन होतील. वक्त्यांची व्याख्याने होतील.सांयकांळी तीन ते पाच या वेळेत साहित्य संमेलन समारोप सोहळा होईल. समारोपात मान्यवर सत्कार व मार्गदर्शन होईल. समाजाच्या विविध प्रश्नांवर ठराव मांडले जातील . आभार प्रदर्शन करून संमेलन समारोप होईल. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक सहभागीचा सत्कार केला जाईल . सर्व साहित्यीकांना प्रमाण पत्र दिले जाईल. साहित्य संमेलनातून जमातीच्या अनेक चळवळीचे प्रश्न मांडले आणि प्रश्न मार्गी लावले आहेत.
या वेळेस खालील मान्यवर उपस्थित होते.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील माळशिरस.
श्री उज्ज्वलकुमार माने पत्रकार, लेखक ,संपादक.
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
बिसलसिद्ध काळे पत्रकार.
प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन होळकर वाडा चांदवड जि.नाशिक. तसेच राज्यातील शैक्षणिक, साहित्यीक, सांस्कृतिक, सर्व क्षेत्रातील कलाकारांनी ,कवी , वक्ते यांनी आपली नावे खालील मान्यवरांकडे कळवावीत.या क्रांतिकारक व लोक चळवळीत सहभागी व्हावे. आपली चळवळीचे अनुकरण राज्यात झाले पाहिजे . आपली साहित्य संमेलने अनेक ठिकाणी प्रतीक्षेत आहेत. करमाळा, आमरावती, यवतमाळ , उस्मानाबाद , औरंगाबाद ,ठाणे,सांगली, महाबळेश्वर, बेॅगलोर. ईदौंर येथे संमेलन घ्यावे अशी अनेकांची जनतेतून मागणी आहे.अशा जनसामान्यांना आपल्या वाटणार्या चळवळीत सामील व्हा.लिहीते व्हा.बोलते व्हा.गाते रहा.अनेक नावे आली आहेत. आपणही खालील मान्यवरांकडे नावे कळवा.
श्री गोविंद काळे वरिष्ठ कवी,लेखक सोलापूर. 8459874278.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर, आमरावती.
राज्य सचिव. धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य फोन 9423434223
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई. कवी,लेखक, नाटककार, अध्यक्ष धर्म पीठ. फोन:7710020069
श्री बिसलसिद्ध काळे लेखक व पत्रकार सोलापूर. प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य. फोन:9921018221
श्री उज्ज्वलकुमार माने लेखक पत्रकार 9922424619
श्री समाधान बागल स्वागत अध्यक्ष 9373531094
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील 7798987001
जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवण्यात यावे.