
साहित्य संमेलन म्हणजे समाजात विविध विषयांवर लेखन, वक्तवे करणारे ,विविध क्षेत्रातील बौद्धीक मान्यवर एकत्र येऊन विचार मथंन करून समाजाचा भूतकाळ,वर्तमान, भविष्य याचा वेध घेवून प्रचार प्रसार करने म्हणजे साहित्य संमेलन.साहित्य संमेलन मेळावा,किंवा जत्रा,यात्रा नसते.किती संखेने लोक सहभागी झाले याला महत्व नसून किती विचारवंत एकत्र आले व काय चर्चा झाली याला महत्व असते. बौद्धीक द्रुष्ट्या किती लोक समाजात निस्वार्थ पणे जिवंतआहेत याचा पुरावा व जमातीचा आरसा म्हणजे साहित्य संमेलन.
आपण पहातो अनेक स्वयंघोषित, पत्रकार,लेखक, नेते हे ईतिहास, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक गप्पा मारताना,सल्ले देताना दिसतात वेळ आल्यानंतर ते कोठेच दिसत नाहीत. ईतिहास पुरूषांच्या जयंती पुण्य तिथीला ईतिहास माहिती नसताना भरघोस पैसा गोळा करून राजकीय स्वार्था साठी दुकाने थाटून नाचनारी गिधाडे अनेक दिसतात. पण खरा ईतिहास, साहित्य, संस्कृती , जतन, संवर्धन, करण्याचे काम हे साहित्य संमेलन करत असते.
पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन बेलाटी उत्तर सोलापूर महाराष्ट्र राज्य याची पहिली बैठक दि.३१डिसेबर २०२३ रोजी बाळू मामा मंदिर विजापूर बायपास बेलाटी येथे झाली होती. दिनांक ०३|०२|२०२४ रोजी साहित्य संमेलन जाहीर केले .
तयारी साठी विस दिवस अवधी होता.त्या ठिकाणी एकदम जवळ कोणतीच मानवी वस्ती नव्हती. सोलापूर पासून ९|१० किमी. येण्या जान्यासाठी वाहन व्यवस्था नव्हती. त्यामुळे लोक येणार नाहीत असे अनेक जाणकारांचे मत होते.
तरीही मी ,श्री उज्ज्वलकुमार माने पत्रकार लेखक, सिध्दारूड बेडगनूर सर , श्री बिसलसिद्ध काळे, प्रा .श्री देवेंद्र मदने सर, आम्ही नियोजन करत होतो.

श्री आर एस चोपडे सर, श्री संभाजीराव सुळ,श्री चंद्रकांत हजारे,श्री संजय सोनवनी इतिहास कार व संशोधक, प्राचार्य डाॅ.मधुकर सलगरे लेखक, ऐडव्होकेट रामहरी रूपनवर मा.आमदार नियोजीत अध्यक्ष मार्गदर्शन करत होते.
श्री सिध्दारूड बेडगनूर सर यांनी संयोजन आणि ग्रंथ दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम जबाबदारी घेतली.त्यांना सहकार्य देवेंद्र मदने सर करत होते.श्री उज्ज्वलकुमार माने यांनी परिसंवाद आणि साहित्यिक पाठपुरावा याची जबाबदारी घेतली.बिसलसिध्द काळे समन्वयक म्हणून काम करत होते. या लोकांनी खूप कष्ट करून साहित्य संमेलन यशस्वी केले. ईतिहास आणि समाज त्यांचा नेहमीच ऋणी राहील.
मी स्वतः एक, श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष यांनी एक,प्राचार्य आर. एस. चोपडे सर एक अशा फक्त तिन पत्रकार परिषदा झाल्या. राज्यभरातून प्रिंट मिडीयाने,लिडींग सर्व दैनिकानी भरपूर कार्यक्रमाची प्रसिद्धी केली. ऑल इंडिया रेडिओ नी छान बातम्या दिल्या. सरकारी मुलाखत ही प्रसारीत केली.शेवटचे पंधरा दिवस आमोल पांढरे पत्रकार सहभागी झाले. श्री सिध्दारूड बेडगनूर सर, श्री ओंकार बेडगनूर सर, धर्मसाळी सर, श्री होनमाने सर यांनी १५ दिवस व शेवटचे दोन दिवस प्रंचड कष्ट घेतले. ग्रंथ दिंडी, सुत्र संचलन,सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. श्री गोविंद काळे यांनी कवी संमेलनासाठी मदत केली. अहमदनगर, पुणे येथील पुस्तकांचे स्टाॅल,धनगरी लोकरीच्या बिहार राज्यातील कला वस्तू घेऊन आले होते. श्री शिवाजीराव बंडगर सर करमाळा यांनी आणलेले हलगी पथक, अहिल्य शिक्षण संस्थेचे म्हसवड येथील मुलींचे गज न्रुत्य, टिपरी पथक,बेडगनूर सरांचे दोनसे मुला मुलींचे उत्कृष्ट लेझीम पथक , करमाळा धायखिंडीचे पुरूष गज न्रुत्य, सर्व सहभागी कवी, साहित्यिक, सर्व क्षेत्रातील बौद्धीक मान्यवर यांनी संमेलनास दोन दिवस हजेरी लावली,सर्व प्रिंट मिडीया ,सर्व दैनिक यांनी दोन दिवस भरभरून प्रचार प्रसार केला. संमेलन जनमानसात पोहचवण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट्र राजाच्या काना कोपऱ्यातून बौद्धीक, मंडळी आली होती. त्याच दिवसी मनोज जरांगे पाटील यांचे रस्ता रोको व आमरावती, मुंबई, पुणे येथील वधूवर परिचय मेळावे व सव्वीस तारखेची लग्न तिथ यामुळे बरेच लोक धर्म संकटात आडकले होते. अनेक जण फक्त भेटून गेले, अनेक जण येवू शकले नाहीत. उद्घाटन ते समारोप सर्व कार्यक्रम नियोजीत वेळेत पार पडले. उपस्थित सर्व क्षेत्रातील साहित्यीक, पत्रकार, समाज सेवक यांचे आभार व संयोजकांचे अभिनंदन. पाचव्या ईतिहासा च्या पानावर लेखन,फोटो, वक्तृत्व, कर्त्रुत्व या माध्यमातून आपले सर्वांच्या स्म्रुती कायम ईतिहास जमा राहणार आहेत. आपण आणखी एक ईतिहासाचे पान उलटले.
प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले.
आपले सर्व सहभागी.
—————————- 🔏ऐडव्होकेट, श्री रामहरी रूपनवर अध्यक्ष
प्रा.आर एस चोपडे सर सांगली संमेलन पूर्व अध्यक्ष.
डाॅ.श्रीपाल सबनीस सर,श्री राजा माने वरिष्ठ पत्रकार, श्री दिलीप माने मा.आमदार,
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष साहित्य संमेलन.
श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते आंबेजोगाई.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील.
पूर्व स्वागत अध्यक्ष.
श्री संजय शिंगाडे सर. सांगोला.पूर्व स्वागत अध्यक्ष
श्रीराम हणमंतराव पाटील स्वागत अध्यक्ष.
प्राचार्य श्री कुंडलिक आलदर सर सांगोला,
श्री सिध्दारूड बेडगनूर सर संयोजक सोलापूर. प्रा.देवेंद्र मदने सर,सोलापूर, .
श्री हणमंतराव चौरे शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा.
श्री उज्ज्वलकुमार माने संपादक, लेखक, सोलापूर.
मा.विष्णु माने नगरसेवक
सांगली.
मा.पाडुंरग रूपनवर सांगली. मा.बळवंतराव खोत सांगली.
मा.प्रवीण वाघमोडे सर, जत.
श्री शिवाजीराव बंडगर सर करमाळा.
ईजिंनियर अकुंश शिंदे सरपंच पोथरे करमाळा.
श्री बाळासाहेब टकले करमाळा,
श्री विनायक काळदाते नाशिक.
श्री अगंद देवकते रासप.
करमाळा.
श्री गणेश पुजारी पत्रकार पुणे.
श्री सलीमभाई पटेल पत्रकार म्हसवड माण,
आमोल पांढरे पत्रकार कोल्हापूर,
श्री पकंज देवकते रासप मंगळवेढा.
श्री रामचंद्र धर्मसाळी सर.
श्री जगदेव बंडगर
सोलापूर.
श्री अजिनाथ कोळेकर करमाळा.
श्री सदाशिव व्हनमाने सर सुत्र संचालक.
श्री कुंडलिक आलदर सर सांगोला.
श्री बिलन सिद्ध काळे प्रसिद्धी प्रमुख.
श्री ओंकार बेडगनूर सर सुत्र संचालक सोलापूर,
श्री जगन्नाथ सलगर करमाळा,
डाॅ.प्रकाश महानवर कुलगुरू.
डाॅ.श्री श्रीमंत कोकाटे पुणे,
श्रीमती शोभाताई पाटील सोलापूर. पंडीत श्री चंद्रकांत बिज्जरगी गुरूजी.विजापूर,
श्री चन्नविर भद्रेश्वर मठ,श्री मारोतराव वाघमोडे कर्जत, सौ रूपाली लंभाते पुणे,श्री बालाजी पेठे नांदेड, प्रा.श्री पगडे सर नांदेड,
श्री संजीवन खांडेकर सर भूम,
श्री रामचंद्र खांडेकर दाजी मोहळ, डाॅ.प्रा.उत्तमराव हुडेंकरी सर,प्राचार्य डाॅ.मधुकर सलगरे सर लातूर, प्रा.डाॅ.संगिता पैकेकरी,प्राचार्य डाॅ.मिराताई शेंडगे, प्रा. डाॅ.महेश मोटे उदगिर, लेखक श्री हरिभाऊ कोळेकर बार्शी, श्री मल्हारी नवले चोराखळे उस्मानाबाद, श्री गोविंद गोरे नांदेड,
श्री निवांत कोळेकर सर सांगली.
श्री विक्रम ढोणै जत,
मा.श्री दिगंबर लवटे बंटी सांगोला,श्री चंद्रकांत कोळेकर सोलापूर,
डाॅ.संदिप हजारे कोल्हापूर, डाॅ.उषा देशमुख सांगोला,श्री रामदास कोकरे सहआयुक्त नगर विकास जिल्हाधिकारी कार्यालय लातूर,श्री नामदेव शिंदे पिसआय उत्तर सोलापूर, श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे.मुंबई, श्री नागु विरकर पालघर,
श्री चेतनभाऊ नरूटे शहर अध्यक्ष काँग्रेस पक्ष, श्री बाळासाहेब शेळके नेते दक्षिण सोलापूर, श्री संजय क्षीरसागर नेते मोहोळ,
श्रीमती विजया कोकाटे इंदापूर,
प्राचार्य श्री नजन सर पुणे,श्री जगन्नाथ पैकेकरी, श्री विलास पाटील सोलापूर, श्री सिद्राम वाघमोडे सोलापूर, श्री दाजी वाघमोडे मोहोळ
श्री अकुंश निरमळ बिड.
कु.बेबी खुरने बुलढाणा