मा. डॉ. राजु़भाऊ डांगे,एक सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व

Share this...

आमचे सहकारी राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊप- वधुवर परीचय‌ मेळाव्यात,अमरावती चे सक्रिय पदाधिकारी तथा मंगलयोग‌ परीचय पुस्तिका प्रकाशन प्रमुख श्री.डॉ.एड.राजु़भाऊ डांगे खरोखरच हरहुन्नरी, सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व असुन ते सतत‌ योग प्रशीक्षण,वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान तसेच‌ कुठल्याही सामाजीक कार्यकमात सतत व्यस्त असतात.ते स्वत: सांखीकी अधिकारी वर्ग-२ या पदावर कार्यरत असताना सुद्धा त्यांना शिक्षणाचा जबरदस्तं ध्यास‌ असल्यामुळें त्यांनी नोकरी करुन आतापर्यंत १४ पदव्या प्राप्त‌ केल्या असुन त्यामध्ये ४ डॉक्टरेट,७ स्नातकोत्तर, व ३ स्नातक पदव्यांचा समावेश आहे.त्यामध्ये पिएचडी,एलएलएम सारख्या पदव्यांचा समावेश आहे.याच बरोबर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तत्वज्ञानात ग्रामगिताचार्य हि पदवी सुद्धा त्यांनी प्राप्त केली आहे.ते स्वत:आंतरराष्ट्रीय योग ट्रेनर तसेच जेसीआयचे रास्ट्रीय‌ प्रशिक्षक असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत हजारो ट्रेनिंग,प्रक्षिक्षन कार्यक्रम घेऊन हजारो विद्यार्थी तसेच प्रक्षिक्षणार्थी यांना प्रशीक्षीत केले आहे. ते आता सुद्धा आठवड्यांतुन चार दिवस रोज सकाळी योग शिबीर घेत‌ असुन त्यामध्ये भारत तसेच भारता बाहेरील योग साधक सहभागी होऊन त्यांच्या शिबीराचा लाभ घेत‌ असतात‌.त्यांचे सदर सामाजिक योगदान,योग शिबीरे,विविध विषयावरील व्याख्याने,जेसीआय चे अध्यक्ष म्हणुन केलेले ऊल्लेखनिय‌ कार्यामुळेच त्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय,राष्ट्रीय स्तरावरील तसेच ईतरही क्षेत्रातिल विवीध पुरस्कार मिळाले आहेत. ते आमच्या राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊप- वधुवर परिचय मेळाव्याचे सुद्धा प्रमुख आधारस्तंभ असुन सतत १५ वर्षापासुन मंगलयोग‌ परीचय पुस्तिकेच्या प्रकाशनाची जबाबदारी ते लिलया पार पाडतात.तसेच दरवर्षी अमरावती येथे होणा-या राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊप- वधुवर परीचय‌ मेळाव्याच्या कार्यकमाचे ते स्वत: सुत्रसंचालन सुद्धा करीत असून सदर कार्यक्रम भारदस्त व अतिशय सुत्रबद्ध होत असल्यामुळें महाराष्ट्रातुन सर्वच स्तरावरुन सदर कार्यक्रमाची स्तुति होत असते. असे आमचे राजाभाऊ डांगे सर्वच क्षेत्रात सर्वगुणसंपन्न असुन त्यांचे बाबत जेवढे लिहावे तेवढे कमीच पडते.त्यांना आपल्या राष्ट्रीय आदिवासी धनगर‌ साहीत्य‌ सम्मेलनामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाल्याबद्धल त्यांचे राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊपवधुवर परिचय मेळावा आयोजन समीती अमरावती तसेच धनगर एंप्लॉईज वेलफेयर असोशिएशन (देवा संघटना) अमरावती तर्फे खुप खूप अभिनंदन.🙏🙏. लेखक:-श्री.ज्ञानेश्वर ढोमणे, अध्यक्ष, देवा संघटना तथा संयोजक, राज्यस्तरीय धनगर‌ समाज ऊप- वधुवर परीचय‌ मेळावा,अमरावती

Share this...

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design