प्राचार्य डाॅ.अभिमन्यु टकले
संस्थापक धनगर धर्म पीठ/आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏
बॅरिस्टर टि के शेंडगे यांनी दुष्काळग्रस्त भागातील मुलामुलींना शिक्षण मिळावे या साठी महाराष्ट्र राज्यातील पहिली अहिल्या शिक्षण संस्थेची शाळा सुरू करुन ज्ञानाची ज्योत पेटवली. प्राचार्य आर एस चोपडे सर हे वयाच्या एकविसाव्या वर्षी १९७१ ला संस्थेत पहिले प्रशिक्षित शिक्षक म्हणून रूजू झाले.प्राचार्य चोपडे संरानी शैक्षणिक संस्थेची पालखी आपल्या खांद्यावर घेतली आणि बॅरिस्टर टि के शेंडगे यांनी पेटवलेल्या या ज्ञानाच्या ज्योतीला ज्योत पेटवत ज्ञानाची गंगा सांगली,सातारा, सोलापूर च्या दुष्काळी भागात नेली.पेटवलेल्या एका ज्योतीचे रुपांतर चोपडे संरानी दीपस्तंभात केले. दुष्काळी भागातील अनेक विद्यार्थ्याची कुटुंब या दीपस्तंभानी उजळून निघाली आहेत. अनेक विद्यार्थ्यी देश सेवा करत शैक्षणिक, औद्योगिक, संरक्षण, पोलीस, प्रशासकीय, सहकार, वैद्यकीय क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहेत. संस्थेत बालवाडी पासून काॅलेज पर्यंत 33युनीट आहेत. ३०० शिक्षकव्रुंद आहेत. बारा हजार विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. संस्थेत १४ माध्यमिक विद्यालय आहेत.६कनिष्ट महाविद्यालय आहेत. १महाविद्यालय आहे.०५ प्राथमिक शाळा आहेत. ०४ वस्ती ग्रह आहेत. सीबीएसई नर्सरी ते दहावीपर्यंत शाळा आहे. तिनशे शिक्षक आहेत. चोपडे सर ३५वर्षे मुख्याध्यापक,१३वर्षे अहिल्या शिक्षण संस्थेचे सचिव होते.१८वर्षे झाले संस्थेचे कार्यकुशल अध्यक्ष आहेत.
अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कार्यात सहभागी आहेत. ३०/६/२००८ला सर सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ही तरुणाला लाजवेल असे कार्य करीत आहेत. २०१७ पासून म्हणजे पहिले आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मध्ये सहभागी आहेत. २०१९ला तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मध्ये सर सक्रिय सहभागी झाले.
सरांनी अनेक संस्थेचे अंक सपांदित प्रसिद्ध केले आहेत. ३००वर लेख लिहिले आहेत.संरानी प्रेमाचे झरे नावाचे आत्मकथन लिहिले आहे.संराच्या या शैक्षणिक,सामाजिक, साहित्यिक प्रकाशमय कर्तृत्वाचा विचार करून चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य अध्यक पदी निवड झाली. सांगोला वासीया बरोबर तीन दिवस धूमधडाक्यात साहित्य संमेलन घेतले आणि सर्व माणदेश उजळून निघाला.
ग्रामीण भागातील समाज सेवकाना विश्वासात घेऊन,शिक्षकांना मार्गदर्शन करत अहिल्या शिक्षण संस्था दिप समई सारखी कार्य करत आहे.
विद्यार्थ्यी समईतील तेला सारखे कार्य करत आहेत .
संस्थेतील शिक्षक समईतील वाती सारखे जळत कष्ट करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष चोपडे सर दिप समई ची ज्योत बनून दिप स्तंभासारखे मार्गदर्शन करत आहेत.प्राचार्य आर एस चोपडे सर यांचा आम्रुत महोत्सवी वाढदिवस रविवार दि.१५/०६/२०२५ संस्था व माजी विद्यार्थ्यी साजरा करत आहेत. संराचे अभिनंदन. प्राचार्य आर एस चोपडे सर आप जिवो हजारो साल. साल के दिन हो पचास हजार.