सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक साठी अध्यक्ष निवडी बाबत.

Share this...

सर्व क्षेत्रातील मान्यवराना कळवण्यात येत आहे की सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची उपराजधानी होळकर वाडा,रंगमहाल चांदवड जि.नाशिक या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

आपण साहित्य संमेलन स्थळ जाहीर केले आणि सर्व महाराष्ट्र राज्याचे लक्ष या सुंदर अशा रंगमहालाकडे लागले. या बद्दल दैनिक प्रिंट मिडीयात राजस्तरीय लेख लिहिले गेले आणि राज्यातील आणि देशातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या. हा रंगमहाल पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येत आहे.संमेलन जाहीर केल्या नंतर अनेक निवडूनूका आल्या त्यामुळे संमेलनाला घेण्या साठी उसीर झाला आहे. देशभरातून आणि राज्यातून ही अनेक मान्यवरांना या साहित्य संमेलनाची उत्सुकता आहे.
तसेच देशभरातून हे संमेलन घेण्यासाठी अनेक प्रस्ताव येत आहेत.

यी ठिकाणी होणार्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष निवड करणे गरजेचे आहे. आपले साहित्य संमेलन हे सर्व क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांसाठी व सर्व जाती धर्मा साठी खुले असते. आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कसे असावेत मा.संजय सोनवणी लेखक ईतिहास संशोधक यांच्या सारखे उच्च कोटीचे बौद्धिक समाजा साठी,लेखनी साठी आयुष्य समर्पण केलेले असावेत. मा.प्राचार्य आर एस चोपडे सर यांच्या सारखे असावेत. प्राचार्य आर एस चोपडे सर यांनी अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था काढल्या या साठी आपल्या आयुष्याचा यज्ञ केला.

अध्यक्ष मा.आमदार रामहरी रुपनवर यांच्या सारखे असावेत ज्यांनी सर्व आयुष्य सामाजिक, राजकीय, साहित्यिक प्रबोधना साठी घालवले.

आपले सर्व अध्यक्ष उच्च विद्याविभूषीत, समाजा साठी समर्पित, सर्व सामान्य माणसाला आपले वाटणारे साहित्यिक क्षेत्रा बरोबर सामाजिक संवेदनशील असनारे असे आहेत व असावेत.अध्यक्ष पदा साठीचे मान्यवर हे,पत्रकारीता, साहित्य,संस्कृती, शिक्षण, प्रशासन, राजकारण किंवा कोणत्याही क्षेत्रातील असावेत त्यांनी समाजा साठी लेखन प्रबोधन केलेले असावे.

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व विभागातून अध्यक्ष पदासाठी नाव सुचवावे. तसेच अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतरच साहित्य संमेलनाचे विषय व पुरस्कार निवड समिती जाहीर केली जाईल. तरी राज्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या आपल्या हक्काच्या व्यासपीठात सामील व्हावे.

खालील मान्यवराकडे फोन करुन नावे कळवावीत.
श्री गोविंद काळे
वरिष्ठ कवी,लेखक सोलापूर. 8459874278.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर
आमरावती.
राज्य सचिव. धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य
फोन 9423434223.
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई. कवी,लेखक, नाटककार, अध्यक्ष धर्म पीठ.
फोन:7710020069,
श्री बिसलसिद्ध काळे लेखक व पत्रकार सोलापूर. प्रसिद्धी प्रमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
फोन:9921018221′

Share this...

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design