सध्या लोक सभेचे वादळ देशभरात घोंगावत आहेत. मी 48 लोकसभा धनगर जमातीने लढवाव्यात असे लिहले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांने मला लिहले एक तर तुमच्या कडे मोदींना पर्यायच नाही.दुसरे भाजपने सर्व जाती जातीत भांडण लावून बरोबर करून ठेवलेले आहे. मराठा ओबीसीला मतदान करनार नाहीत. ओबीसी जाती मराठ्यांना मतदान करणार नाहीत.धनगर जमातीला कोणीही लोसभा उमेदवारी देणार नाहीत. राष्ट्रीय समाज पक्षाला उमेदवारी देऊ असे पवार साहेब म्हणाले असले तरी पहिली पसंती मोहीते पाटलांना, दुसरी पसंती निंबाळकर यांना, तिसरी पसंती राष्ट्रीय समाज पक्ष.जर राष्ट्रीय समाज पक्षाने दगा बाजी केली तर माजी आमदार नारायण पाटील यांना ही उमेदवारी देवू शकतात. स्वर्गीय मा.मंत्री गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ.अनिकेत देशमुख ही उमेदवारी मागत आहेत.डाॅ अनिकेत यांना उमेदवारी दिली तर महाराष्ट्र राज्यातून पवार साहेब यांच्या पक्षाला धनगर जमातीचे मतदान होऊ शकते. बारामती,सांगली, सोलापूर या खासदारकीच्या तिनही जागा राष्ट्र वादी मुळे येवू शकतात.
खर तर उमेदवार असा असावा की सर्व सामान्य माणूस ही त्याना भेटेल. सध्याचे माढ्याचे खासदार महागरवीष्ट होते.सर्व सामान्य माणसाना भेटत नसत खरंतर असे खासदार काय कामाचे? धनगर जमातीने सध्याच्या खासदारांना मतदान करू नये? माढा आणि निंबाळकर पाडा ही मोहीते पाटील यांची घोषणा योग्यच आहे.
मला सांगा माढ्याचे खासदाराला आपण मतदान केले पण एखाद्या धनगर जमातीच्या कार्यक्रमात यांना पाहीले का? यांनी सरकारकडून फुकट मिळणारा चहा कधी जमातीच्या माणसाला पाजला का?अशा लोकांना मतदान करून काय करणार?
सोलापूरचे खासदार तर जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन खासदार झाले.त्यांनी तर महाराज असून लबाडी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून खासदार की मिळवली. भाजपने ही त्यांना पाठीशीच घातले.हे महाराज सर्व धर्मा च्या कार्यक्रमाला जात पण धनगर समाजाच्या मदतीला आणि कार्यक्रमाला कधी दिसले का?
आपले शिष्टमंडळ नागपूर येथे केंद्रीय मंत्रि यांना आरक्षण व धनगर जमातीच्या व्यथा मांडण्या साठी गेले त्यांनी स्पष्ट सांगीतले परत धनगर जमातीने माझ्याकडे अशा मागण्या आणू नयेत. मी जात आणि आरक्षण याच्या विरोधात आहे. नंतर मी साहित्य संमेलन निमंत्रण घेवून गेलो होतो नागपूर कार्यालयात. त्यांनी दोन वेळा स्वागत केले तिसर्या वेळेस केंद्रीय वाहतूक मंत्री येणार की नाही याच्या चौकशीला गेलो तर मला स्पष्ट सांगण्यात आले आम्ही जातीच्या कार्यक्रमाला जात नाही, यांचा अर्ज काढून टाका.
आणखी एक दिल्लीतील अनुभव. श्री संजय काका पाटील भाजप सांगली खासदार यांनी धनगर जमातीच्या शिष्टमंडळास खासदार निवासात मुक्कामाची परवानगी दिली. पण धनगर समाजाचे लोक मटण खातात म्हणून रात्री बारा वाजता निवासातून हाकलून दिले. यांना मटण खानारांचे मतदान चालते . धनगर चालत नाहीत.
नागपूरहून आखाती देशात शेळया मेंढ्या निर्यात होणार होत्या परंतु सर्व झालेले नियोजन भाजप ने रद्द केले. का रद्द केले तर तिकडे त्यांची हत्या होईल.
दहा वर्षांत धनगर जमातीला काय मिळाले तर एका विद्यापीठाचे लेबल बदलून दिले आणि धनगर मते मिळावीत म्हणून आता अहमदनगर चे अहिल्यानगर नामकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाला कळवणार आहेत. नामकरण झालेले नाही. पण बर्याच नवरदेवानी लग्ना आगोदर वरातीची मिरवणूक काढल्याचे दिसते. फक्त संस्थाचे लेबल बदलून विकास होणार आहे का? यांना धर्माच्या नावाखाली सर्व जातीची मते चालतात जात चालत नाही. भाजप च्या मुख्य निर्णय पक्षात फादर बाॅडी मध्ये एकही धनगर नाही.धनगर समाजाला एनटी, ओबीसी,व्हीजे एनटी भाजप सेलची पदे दिलेली आहेत. शहर, जिल्हाध्यक्ष पद नगण्य आहेत. आपण म्हणजे धनगर जमातीने २०१४ ला पंढरपूर ते बारामती मोर्चा मार्फत धनगर समाज काँग्रेस राष्ट्रवादीतून काढून भाजप कडे वळवला होता. काँग्रेस राष्ट्रवादीतून एमआय एम मार्फत मुस्लिम बाहेर काढले म्हणून भाजप सरकार आले होते.
२०१९ला धनगर समाजा मुळे भारिप बहुजन महासंघाचे रूपांतर वंचित बहुजन पक्ष असे झाले होते यामुळेही भाजप चाच फायदा झाला होता.या वेळेस धनगर नसल्यामुळे वंचित बहुजन हा फक्त बहुजन राहीला आहे. गेल्या वेळेस प्रा राम शिंदे साहेब व महादेव जानकर साहेब हे भाजप मध्ये कॅबिनेट मंत्री होते, एक राज्य सभा सदस्य होते. या वेळेस भाजप ला नवीन भ्रष्टाचारी मित्र मिळाले धनगर राजकारणात ग्रहीत धरत बासनात गुंडाळून ठेवले आहेत.
यांना राजकारण करण्यासाठी धर्म लागतो, सत्ते साठी जातीची मते चालतात. जातीचे आरक्षण,समस्या आल्या की याच्या डोळ्यात काय जाते हे त्यानाच माहीत. त्यामुळे आपण आता तरी डोळे उघडू. काँग्रेस धनगर समाजाचा रोष भोगतेय. आपण आजही यांना तिकीटे जागा मागतो हेच दुर्दैव आहे. त्यामुळे जैसे है या स्थितीत निवडणूक लढवाव्यात. सांगली सोलापूर व माढा भाजपला राजकीय द्रुष्ट्या गाढा.माढा फसवलेले सगळे गाडा.आपली राजकीय शक्ती निर्माण करा. नेते ग्रहीत आणि मतदार वार्यावर. हीच वेळ आहे.
जनता जाग्रुतीची हीच वेळ आहे. येते सहा महिने सर्व चळवळी बंद ठेवा राजकीय एक व्हा.४८ आणि २८८ लढवाव्यात.
मराठा, धनगर समाजाने या मुजोर, भ्रष्ट नेत्याना गाव बंदी न करता प्रचार बंदी करावी.आपल्याला दहा वर्षे गाजर दाखवलेत. यांना ही गाजर दाखवा परत पाठवा.
समाजाचा मान हाच आपला खरा सन्मान.
जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत.