सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि. नाशिक अध्यक्ष पदी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांची निवड

Share this...

राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन शनिवार आणि रविवार दिनांक ११ व १२ एप्रिल २०२६ ला होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे होत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची सहावे राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड जि.नाशिक पदी निवड करण्यात आली आहे. प्राचार्य डॉ. अभिमन्यु टकले संस्थापक राष्ट्रीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांनी निवड जाहीर केली आहे.

तसेच हे साहित्य संमेलन होळकराची उपराजधानी होळकर वाडा चांदवड जि.नाशिक येथे होत आहे. संयोजक श्री बापूसाहेब शिंदे आहेत. कार्याध्यक्ष शिवाजी ढेपले आहेत. स्वागताध्यक्ष समाधान बागल आहेत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दीनिमित्त होळकर वाडा चांदवड जि. नाशिक येथे दिनांक शनिवार व रविवार ११ व १२ एप्रील २०२६ रोजी हे आदिवासी धनगर साहित्य संमेलन होत आहे.

डॉ. प्रकाश महानवर हे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत होते. ०१ जून १९६७ रोजी जन्मलेल्या प्रा. महानवर हे पॉलिमर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. डॉ. प्रकाश महानवर हे शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांपासून कार्यरत असून मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील पॉलिमर आणि सरफेस इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तिथे ते मानव संसाधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही कार्यरत होते. डॉ.प्रकाश महानवर यांनी केमिकल व प्लास्टिक टेक्नॉलॉजीमधून बीएससी आणि एमएस्सी केले असून पॉलिमर क्षेत्रात पीएचडी केली आहे. त्यांच्या नावे पॉलिमर क्षेत्रात संशोधनपर ५ राष्ट्रीय आणि आतरराष्ट्रीय पेटंट्स असून २ पेटंट्ससाठी अर्ज केलेला आहे. १२ संशोधनपर शोधनिबंध, राष्ट्रीय उद्योगासाठी सल्लागार म्हणून कार्य. आजपर्यंत त्यांनी ११२ संशोधनपर शोधनिबंध लिहिले असून यातील अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत ३२ संशोधनपर प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली असून ९ विद्यार्थी पीएचडी करत आहेत. अनेक राष्ट्रीय उद्योगासाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही कार्य केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य आहेत. महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्स आणि द कलर सोसायटीचे ते फेलो आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कुलगुरू म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यापीठ विकास व शैक्षणिक क्षेत्राचा विकास करत विद्यापीठाचे नावलौकीक देशात आणि प्रदेशात ही केले आहे. मूळचे देवडी (ता. माण, जि. सातारा) येथील डॉ. प्रकाश महानवर यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. त्यांच्याकडे अर्धा एकर शेती अन्‌ काही मेंढरे होती. आई-वडील दोघेही अशिक्षित असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही हे विशेष. माळरानावर मेंढरे राखतच त्यांनी माध्यमिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले. गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. प्रकाश यांनी मानगड येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहिवडी येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबई विद्यापीठात विद्यार्थी म्हणून शिक्षण घेतले आणि त्याच विद्यापीठात नोकरीला लागले. विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या या असामान्य कर्तव्याची दखल घेत त्यांची अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यापीठात आज त्यांना अध्यक्ष पदाचे निवड पत्र देण्यात येत आहे. तरी महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक साहित्‍यीक, सांस्‍कृतीक क्षेत्रातील मान्‍यवरांनी दिनांक ११ व १२ एप्रील २०२६ रोजी या बौध्‍दीक कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा. हे व्‍यासपीठ सर्व जाती धर्मासाठी मोफत व खुले असणार आहे.

खालील मान्यवरानी कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.प्राचार्य
डॉ.अभिमन्यु टकले संस्थापक सोलापूर,
मा.आमदार रामहरी रूपनवर अध्यक्ष.
मा.आमदार हरिदास भदे आकोला.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील माळशिरस,
श्री हणमंतराव चौरे शिवसेना सातारा.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय मुंबई.
प्राचार्य आर. एस. चोपडे सर सांगली,
श्री बापूसाहेब हटकर.मुंबई अध्यक्ष धनगर धर्म पीठ.
श्री संभाजीराव सुळ उपाध्यक्ष लातूर,
डाॅ. आर डी शेंडगे सर जनरल सर्जन उमरगा.
डाॅ. हणमंतराव किणीकर न्युराॅलाॅजीस्ट लातूर.
मा.सुभाष बोंद्रे लेखक व वक्ते दैनिक दिव्य मराठी कार्याध्यक्ष महाराष्ट्र. संभाजीनगर
प्रा.यशपाल भिंगे नेते,वक्ते,लेखक नांदेड.
प्रा.संजय शिंगाडे सांगोला, प्रा.देवेंद्र मदने सर, प्रा.सिद्धारूढ बेडगनूर सर, गोविंद काळे वरिष्ठ साहित्यिक, उज्ज्वलकुमार माने लेखक व पत्रकार सोलापूर, समाधान बागल चांदवड स्वागताध्यक्ष . बिसलसिद्ध काळे
शिवाजी ढेपले कार्याध्यक्ष निफाड, श्री बापूसाहेब शिंदे नाशिक. संयोजक. श्री मच्छिंद्र बिडगर चांदवड. श्री मुकुंद होळकर चांदवड. श्री विनायक काळदाते.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे सर.सचिव.
श्री पांडुरंग रुपनवर उद्योजक सांगली राज्य उपाध्यक्ष.
श्री संजीवन खांडेकर सर ता.भूम मराठवाडा प्रमुख.
श्री बळवंतराव खोत सांगली.
श्री विष्णु माने नगरसेवक सांगली.
डाॅ स्नेहा सोनकाटे धाराशिव.
डाॅ . रक्षा महाजन लेखीका नागपूर.
श्री शरद चोरमले राज्य समन्वयक ईट.
श्री आमरजीत बारगळ राजे नंदूरबार.
प्राचार्य दत्तात्रय बारगळ चांदवड.
श्री भाऊसाहेब ओव्हाळ नाशिक.
श्री राघवेंद्र गावडे उमरगा.
प्रा.शिवाजी बंडगर सभापती करमाळा.
डाॅ मधुकर सलगरे लेखक लातूर. झ
एडव्होकेट अभिमान हाके पाटील मुंबई.
श्री नागू विरकर मुंबई.
श्री गणेश पुजारी पुणे.
श्री अंकुश भांड पुणे.
प्रा.नजन सर पुणे.
मा.सुभाष पाटील खेमनार शिर्डी.
श्री खंडु महानवर मुंबई.
श्री भारत कवीतके साहित्यिक मुंबई.
प्राचार्य कुंडलिक आलदर सर सांगोला.
बाळासाहेब टकले करमाळा.
श्री अंगद देवकते करमाळा.
श्री बालाजी पेठेकर कवी नांदेड.
श्री शिवाजी कोनापूरे पत्रकार नांदेड.डाॅ.अनिल दुधभाते नेत्र तज्ञ पुणे.
डाॅ. नितीन वाघमोडे IRS मुंबई.
प्रा.डाॅ महेश चौरे आंबेजोगाई
श्री व्यंकटेश चामनर सर आंबेजोगाई.
श्री रामदास कोकरे उपायुक्त नवी मुंबई.
श्री पवन थोटे यवतमाळ.
श्री प्रभाकर दिवनाले महाराज लेखक आकोला.
श्री लक्ष्मण सरोदे पत्रकार आकोला.
श्री मल्हारी नवले चोराखळी.

Share this...

Explore

Contact Us

202 Sagar Complex
377 South Kasba
Solapur - 413001

Support

With enthusiastic employees and volunteers, we are ready to support you no matter any time.

© Copyright 2026 Dhangar Dharm Peeth All Rights Reserved.
Design & Developed by Nagpur Website Design