रविवार दिनांक ११/५/२०२५रोजी रंगमहाल ता.चांदवड जि.नाशिक येथे साहित्य संमेलन घेण्या साठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. मोजकेच मान्यवर निमंत्रित केले होते.आयोजक होते दोन छावे श्री गणेश निंबाळकर, श्री समाधान बागल दोघे मित्र. मार्गदर्शक होते विनायक काळदाते. समाधान बागल आणि गणेश निंबाळकर हे हाडाचे समाज सेवक व प्रहार चे कार्येकर्ते आहेत. सामान्य कुटुंबातील ते पैशाने खूप श्रीमंत नाहीत. पण ते सामाजिक आणि राजकीय द्रुष्टया खूप श्रीमंत आहेत. कमी वयात त्यांनी समाज सेवेने अनेक लोक जोडले आहेत. गणेश निंबाळकर यांनी विधानसभा लढली आणि दोन नंबर ची ५६००० हजार छप्पन हजार मतदान घेतले. एकाकी लढून बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आले आहेत. जनता हीच यांची श्रीमंती आहे. यांना लहान वयात नाशिक जिल्ह्य़ात कर्तव्याने प्रसिद्धी मिळाली आहे.
या ठिकाणी दुसरा एक चांगला अनुभव आला तो म्हणजे चांदवड चा चौथा स्तंभ म्हणजे प्रिंट मिडीयाचे पत्रकार. चांदवड ची पत्रकारीता म्हणजेच समाजाच्या प्रश्नाचा आरसाच. साहित्य संमेलनाच्या एका बैठकीतच चांदवड चा रंगमहाल (होळकर राजवाडा) महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर आला.पत्रकार गुजराथी यांनी ३०मे२०२५चा रंगमहालावरील लेख दैनिक लोकमत ने राज्य स्तरीय प्रसिद्ध केला. सर्व महाराष्ट्र राज्याने तो वाचला.
चांदवड ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची उपराजधानी. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्वत:चे टाकसाळ ,नाणी तयार करण्याचा कारखाना उभारला होता.या ठिकाणी आयुध निर्माण कारखाना उभारला. रेणुका माता मंदिर जिर्णोद्धार केला. सर्वात महत्वाचे तिनशे वर्षां पूर्वी फक्त सागवान चे लाकूड वापरून सुंदर देखना असा रंगमहाल (राजवाडा) उभारला. ताजमहाल हा संगमरवरी फरशीने बांधकाम करून उभारण्यात आला.पण नैसर्गिक रित्या सागवानी लाकडावर सुंदर कोरीव नक्षीकाम करून उभारलेला हा रंगमहाल वास्तू कला आणि निसर्गाचा एक उक्त्रुष्ट सांस्कृतिक संगमच आहे.
धनगर समाजाचा ईतिहास आणि संस्कृती खुप मोठी आहे हे जपन्या साठी ,वारसा पुढे चालवण्या साठी साहित्य संमेलनाची गरज असते. साहित्य संमेलनासाठी, कला, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्र,ईतिहास, संशोधन, मिडीया,राजाश्रय याची आवश्यकता असते. वारसा चालवणारे वारस, सजग,बौद्धीक, नसतील फक्त गप्पा मारणारे असतील तर अतिक्रमण करुन किंवा झाकून ईतिहास नष्ट केला जातो.आज राजा हल सातवाहन पासून,चंद्रगुप्त मौर्य, आशोक सम्राट, होळकर शाही, शिंदे,भोसले, मा.स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे , मा.आमदार गणपतराव देशमुख पर्यंत चा ऐतिहासिक वारसा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे चालवत आहे. चांदवड चे साहित्य संमेलन अभूतपूर्व होणार. धनगर जमातीचे एकमेव राष्ट्रीय व्यासपीठ आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हेच आहे. लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात कोणतेही शासन धनगर जमातीला सक्षम करणार नाहित. देशातील लोकशाही संपत असताना
साहित्य संमेलनाची आणि देशातील सजग लोकांची जबाबदारी वाढत असते.आज देशात धर्मशाही आहे.राज्यात छुपा राजकीय जातीवाद होता तो आता उघड झाला आहे.राज्यात जमातीचे अनेक सामाजिक कार्य कर्ते आहेत पण त्यांनाही संरक्षण नाही. अनेक राजकीय कार्य कर्ते आहेत. त्यांनाही संरक्षण नाही. राज्यात एखादी संरक्षण समिती असायला पाहिजे.तरुणानी पुढे येऊन अशी एखादी समिती, परिषद स्थापन करावी.
लवकरच आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड महाराष्ट्र राज्य साठी अध्यक्ष निवड करण्यात येणार आहे नावे सुचवावीत. तसेच लवकरच संमेलनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलन चांदवड महाराष्ट्र राज्य हे अभूतपूर्व होणार हे नक्कीच. तसेच साहित्य संमेलना मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करावा.
साहित्य संमेलन बैठकीस खालील मान्यवर उपस्थित होते व सर्वांनी मार्गदर्शन केले आहे.
श्री आर एस चोपडे सर. श्री संभाजीराव सुळ. श्री बाळासाहेब कर्णवर पाटील. श्री विनायक काळदाते, श्री समाधान बागल. श्री गणेश निंबाळकर.
श्री सोमनाथ कर्णवर पाटील.
श्री ज्ञानेश्वर ढोमणे,श्री ज्ञानेश्वर ढेपले,श्री मच्छिंद्र बिडगर, श्री मुकुंद होळकर .श्री बिसलसिद्ध काळे. चांदवड चे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
लेखक:
प्राचार्य डाॅ.अभिमन्यू टकले.
प्रसिद्धी प्रमुख: श्री बिसलसिद्ध काळे पत्रकार.